HW News Marathi
देश / विदेश

इस्लामिक दहशतवादाविरोधाच्या लढाईत अमेरिका नेहमीच भारतासोबत | ट्रम्प

ह्युस्टन । “इस्लामिक दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशाविरुद्धच्या लढाईत आम्ही नेहमी भारतासोबत उभे राहू,” असे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नाव न घेता पाकिस्तानला धमकी वजा इशारा दिला आहे. ट्रम्प अमेरिकेतील ह्युस्टन येथे पार पडलेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात बोलताना दिली. या कार्यक्रमासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलविण्यात आले होते. ‘काय चाललेय’, असा उल्लेख करत पंतप्रधान मोदी यांनी मराठीसह गुजराती, बंगाली, पंजाबी अशा विविध भारतीय भाषांत ‘भारतात सर्व काही छान चालले आहे’ असे सांगितले आणि उपस्थितांची मने जिंकली.

जम्मू काश्मीरमधील कलम 3७० हटवण्याच्या निर्णयामुळे ते लोक अस्वस्थ झाले आहेत. ज्या लोकांना आपला देश सांभाळता येत नाही त्यांना अशांती हवी आहे, अशी टीका मोदींनी नाव न घेता पाकिस्तानच्या पंतप्रधानांवर केली. मोदी पुढे म्हणाले, ” हे लोके दहशतवादाला खतपाणी घालत आहेत. तसेच दहशतवादाचे समर्थन करत आहेत. त्यांना तुम्ही चांगलच ओळखता. अमेरिकेतील ९/११ दहशतवादी हल्ला असो किंवा मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला असो, या हल्ल्यांचे मास्टरमाईंड कुठे सापडतात? असा सवाल मोदींनी उपस्थितांना विचारला.

दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढाई लढण्याची वेळ आता आली आहे. मोदींच्या या वक्तव्यानंतर एनआरजी स्टेडियममध्ये उपस्थित जवळपास ५० हजार लोकांना जोरदार टाळ्या वाजवल्या. अमेरिकेचे ट्रम्प दहशतवादविरोधात उभे आहेत. दहशतवादाविरोधातील या लढाईत अमेरिका आणि इस्राईल मोठ्या ताकदीने उभे आहेत, असे मोदींनी सांगितले. मोदी पुढे म्हणाल, भारतात आता २४ तासांत नव्या कंपनीची नोंदणी होते. पाच वर्षांत आता जवळपास १०० टक्के कुटुंब बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले.

जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना हक्क दिले

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणादरम्यान जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याचा उल्लेखही केल. भारतातून कलम ३७० ला फेअरवेल दिल्याचे मोदी यावेळी म्हणाले. भारतासमोर ७० वर्षांपासून एक मोठे आव्हान होते, ज्याला काही दिवसांपूर्वी फेअरवेल देण्यात आले. आम्ही कलम ३७० देशातून हद्दपार केले आहे. जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना ते हक्क दिले, ज्यापासून ते गेली ७० वर्ष वंचित होते. आमच्या सरकारने गेल्या ७० वर्षांपासून चालत आलेले कलम ३७० रद्द केले. त्यामुळे संविधानातील जे अधिकार इतर भारतीयांना मिळत होते तेच अधिकार जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांना मिळणार आहेत. त्यामुळे एकप्रकारचा भेदभाव नष्ट झाला आहे, असे मोदी म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात, नागरिकत्व विधेयक पुन्हा मांडणार ?

News Desk

मनसेचा झेंडा हटवला गेला….मनसैनिक कोणता झेंडा घेणार हाती ?

Arati More

काही भागातील लॉकडाऊन तरी शिथिल करावा, हसन मुश्रीफांची मागणी

News Desk