मुंबई | गलवान खोऱ्यात भारत-चीन सीमेवर दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. आम्हाला आमच्या जवानांवर अभिमान, सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. भारत जशास तसे उत्तर देण्यास सक्षम आहे, अशा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला दिला आहे. मोदी पुढे म्हणाले, “भारताने कधीही स्वत: हून कोणतेही पाऊल उचललेले नाही. भारत हा शांतताप्रिय देश आहे. भारताने आपल्या शेजारी देशांशी सहकार्याची भावना ठेवली आहे.”
I would like to assure the nation that the sacrifice of our jawans will not be in vain. For us, the unity and sovereignty of the country is the most important…India wants peace but it is capable to give a befitting reply if instigated: PM Narendra Modi #IndiaChinaFaceOff pic.twitter.com/kFIC3F1fE4
— ANI (@ANI) June 17, 2020
पंतप्रधान मोदी कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि १५ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज (१७ जून) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होत आहे. ही बैठक सुरु होण्यापूर्वी पंतप्रधानांनी गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीवर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. तसेच सर्व शहीद जवानांना दोन मिनिटे मौन बाळगून आदरांजली वाहिली.
भारत-चीन सीमेवर गलवान खोऱ्यात डी एक्स्लेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या दोन्ही सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक झडपेत २० भारतीय जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात ही हिंसक झडप झाली होती. सुरुवातीला तीन जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली होती. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार चीनचेही ४३ जवान मारले गेलेत किंवा जखमी झाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.