HW News Marathi
देश / विदेश

देशात लवकरच ई-पासपोर्ट जारी करणार, पंतप्रधान मोदींची माहिती

मुंबई | देशातील नागरिकांसाठी लवकरच एका केंद्रीकृत पासपोर्ट प्रणालीद्वारे चिप बसविण्यात आलेले ई-पासपोर्ट जारी करण्याचे काम सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. पंतप्रधान मोदी वाराणसी येथे प्रवासी भारतीय दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. एटीएम कार्डनंतर आता पासपोर्टमध्येही चिप बसविली जाणार आहे. या पासपोर्ट प्रणालीद्वारे पासपोर्टची सुरक्षा, प्रिंटिंगच्या दर्जात सुधारणा होईल, असे सांगण्यात आले आहे. नाशिक येथील इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये ई-पासपोर्टची निमिर्ती केली जाणार आहे.

“सर्व भारतीयांच्या सेवेसाठी पासपोर्ट सेवेशी संबधित एक केंद्रीकृत प्रणाली तयार केली जाणार आहे. यात आता चिप बसविण्यात आलेले ई-पासपोर्टसाठी काम केले जाणार आहे. त्यामुळे आता भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास या पासपोर्ट प्रणालीद्वारे जागतिक स्तरावरील सर्व दूतावासांशी जोडले जाणार आहेत”, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जल्लोष कर्नाटक विजयाचा…

News Desk

आपच्या २० आमदारांना दिल्ली हायकोर्टाकडून दिलासा

News Desk

वेतन वाढीची मागणी अपुर्ण राहिल्याने आजपासून ३ दिवस बॅंकांचा संप

swarit