मुंबई | मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमातळावर भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहक विमान धावपट्टीवरुन घसरले. यामुळे विमानतळ काही तासांसाठी बंद ठेवण्यात आल्याने हजारो प्रवशांचे हाल झाले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. या घटनेनंतर ५० विमानांच्या वेळापत्रकावर परिणाम झाल्यामुळे प्रवाशांचे हाल झाले आहेत.
Indian Air Force (IAF) aircraft AN-32 was departing for Yelahanka Air Force near Bengaluru, Karnataka. No injuries reported. Runway 27 at Mumbai Airport which it overran isn't available for operations https://t.co/71isOmOXmR
— ANI (@ANI) May 8, 2019
हवाई दलाचे एएन-३२ विमान धावपट्टी क्रमांक-२७ वर ओव्हररन झाल्याची माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल (७ मे) रात्री ११ वाजून ३९ मिनिटांनी भारतीय हवाई दलाचे एएन-३२ हे मालवाहू विमान धावपट्टीवरुन घसरले. हे विमान बेंगळूरु नजीकच्या येलहांका या भारतीय हवाई दलाच्या तळाकडे जात असताना धावपट्टीवरून घसरले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.