नवी दिल्ली | स्वातंत्रदिना निमित्ताने केंद्र सरकारकडून आज (१४ ऑगस्ट) देशाचा सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराची घोषणा केली आहे. सरकारने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानी विमानाने पिटाळून लावणारे हिरो विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. स्वातंत्र्यदिनी विंग कमांडर अभिनंदन यांच्या अतुलनीय कामगिरीसाठी वीरचक्र पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Indian Air Force’s Squadron Leader Minty Agarwal to be conferred with Yudh Seva Medal for her role as a fighter controller during the February 27 aerial conflict between India & Pakistan post IAF airstrikes in Balakot. https://t.co/gW8rNDd0fD
— ANI (@ANI) August 14, 2019
पाकिस्तानमधील बालाकोट येथे असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक केला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननने विमाने पाठवून भारताला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारतीय हवाई दलाने हा हल्ला हाणून पाडला होता. त्यावेळी झालेल्या हवाई चकमकीत विंग कमांडर अभिनंदन यांनी पाकिस्तानचे एफ-१६ विमान पाडले होते. मात्र त्यावेळी विमानात झालेल्या बिघाडामुळे अभिनंदन हे पाकव्याप्त काश्मीरमध्ये पडले. त्यामुळे अभिनंदन पॅराशूटच्या सहाय्याने खाली उतरताना पाकिस्तानी सैन्याच्या हाती लागले. त्यानंतर भारताने आंतरराष्ट्रीय दबाव आणल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली होती.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.