HW News Marathi
देश / विदेश

भारतीय रुपयाची घसरण सुरूच

नवी दिल्ली | आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने भारतीय रुपयाची घसरण सुरूच आहे. डॉलरच्या तुलनेत आज रुपया ७४.२० इतका झाला आहे. “किरकोळ घसरणीनंतर रुपया मजबूत झाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे तणाव घेण्याची गरज नाही. सध्याची स्थिती भारतीय रुपयासाठी फार चांगली आहे. ही आपली सुवर्णकाळाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे,” असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले आहेत. परंतु या संदर्भात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे टीका होत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल न करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर भारतीय रुपयात मोठी घसरण झाली आहे. तसेच शेअर बाजाराचा सेन्सेक्सही ७९२.१७ अंशांनी कोसळला आहे. रुपयाची झालेली घसरण ही मध्यम स्वरुपाची आहे. इतर उभरत्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत रुपयाची घसरण ही कमीच आहे, असे आरबीआयचे गर्व्हनर ऊर्जित पटेल म्हणाले.

या वर्षात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची १३.५ टक्क्यांनी घसरण झालेली आहे. पहिल्याच वेळी डॉलरच्या तुलनेत रुपयाने गाठलेली सर्वात खालची पातळी आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या दरामुळे रुपया कमकुवत झाला आहे. भारतीय रुपयाच्या अवमूल्यनासोबतच सेन्सेक्स आज ७९२.१७ अंशांनी कोसळला आहे. निफ्टी २८३ अंशांनी घसरला आहे. त्यामुळे आता सेन्सेक्स ३४,३७७ अंकावर तर निफ्टी १०,३१६ आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा खनिज तेलाची आयात करणारा देश आहे. भारतातील एकूण ८० टक्के खनिज तेल हे आयात केले जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अँगेला मार्कल चौथ्यांदा चॅन्सलर

News Desk

अनु चाचणी करण्यासाठी अमेरिककेडून पाच अब्ज डॉलर्सची ऑफर- शरीफ

News Desk

पश्चिम बंगाल, तमिळनाडूसह ५ राज्यांच्या निवडणुकांचे बिगूल वाजले, जाणून घ्या तारखा

News Desk
देश / विदेश

हिंदू-मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश मजबूत होणार नाही- रामदास आठवले

Gauri Tilekar

नवी दिल्ली |डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या आदर्श संविधानातील भारत उभा करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर या तिन्ही महासागरांचे पाणी जसे एकत्र येते तसेच हिंदू मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे. हिंदू मुस्लीम ऐक्याशिवाय देश मजबूत होणार नाही,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशनल क्लब हॉलमध्ये लेखक इरफान शेख यांनी लिहिलेल्या योगी आदित्यनाथ आणि मुसलमान या पुस्तकाचे प्रकाशन रामदास आठवले यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी आचार्य शैलेश तिवारी,भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुदेश वर्मा, पत्रकार मोहम्मद आझाद आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान देशात सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाने दिलेल्या मार्गानेच आपण वाटचाल केली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्त्वाची भावना वाढावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. पुस्तकाचे लेखक इरफान शेख यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल गैरसमज पसरविले जात असून त्यांचा मुस्लिमांना विरोध नाही. योगी आदित्यनाथ हिंदू आहेत मात्र ते मुस्लिमांचा द्वेष करीत नाहीत. मुस्लिम आणि योगी आदित्यनाथ यांच्यातील गैरसमज आणि दुरावा मिटण्यास हे पुस्तक उपयोगी पडेल, असे या पुस्तकाचे लेखक इरफान शेख म्हणाले.

Related posts

ध्वजारोहण करून परतणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार

News Desk

५० टक्के शिक्षक आणि कर्मचाऱ्यांसह ‘या’ राज्यांत शाळा सुरू होणार

News Desk

शिंदे गटाला आता केंद्रातही मंत्रीपद? या नावाची चर्चा

Seema Adhe