HW News Marathi
देश / विदेश

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकावरून नवा वादंग

मुंबई | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील स्मारकातील पुतळ्याची उंची तब्बल १०० फुटांनी कमी करण्यात आल्याचा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. इंदू मिल येथील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकासाठी आंबेडकरी अनुयायांनी अनेक आंदोलन केली होती. इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फुटी पुतळा उभारण्याचा मुख्य प्रस्ताव आहे. प्रख्यात मूर्तीकार राम सुतार यांच्याकडे या पुतळ्याचे काम देण्यात आले आहे.

इंदू मिल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंच पुतळा उभारण्याचा मुख्य प्रस्ताव असला तरी आता मात्र या पुतळ्याची उंची २५० फूट एवढी कमी करण्यात आली आहे, असा आरोप आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामुळे आता पुन्हा नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. इंदू मिलची डॉ. आंबेडकर यांच्या स्मारकासाठीची जमीन ही आधी राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाची म्हणजेच केंद्र सरकारची होती.

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकरांच्या स्मारकात पुतळा, चैत्यभूमीपर्यंत परिक्रमा मार्ग, प्रदर्शन हॉल, बौद्ध स्थापत्य शैलीचा घुमट, संशोधन केंद्र, व्याख्यान सभागृह, डॉ. आंबेडकरांनी लिहिलेली पुस्तके व ग्रंथ, तसेच बौद्ध धर्माशी संबंधित जगभरातील ग्रंथ इत्यादी गोष्टींचा समावेश असणार आहे. हे स्मारक १४ एप्रिल २0२0 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ३५० फूट उंच पुतळा चीन मध्ये निर्माण करण्यात येणार असून त्याचे पार्ट भारतात आणून नंतर येथे ते जोडण्यात येतील आणि त्यांनंतर इंदू मिलमध्ये हा पुतळा उभारण्यात येईल अशी माहिती शिल्पकार राम सुतार यांनी दिली होती. इंदूमिल स्थळी उभारण्यात येणाऱ्या या स्मारकासाठी ७४३ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

उद्धव ठाकरे विनंती आहे, तुम्ही खुदा होऊ नका !

News Desk

सरकारच्या पहिल्या ‘कोरोना पॅकेज’चे स्वागत, संकटाचे वळण लक्षात वेळोवेळी नवे ‘पॅकेज’ हवे !

swarit

कुलभूषण जाधव यांना वकिल देण्यास लाहोरच्या बार कौन्सिलचा नकार

News Desk
मुंबई

डोंबिवलीमध्ये एमआयडीसीतील झेनिथ रबर कंपनीला आग

News Desk

डोंबिवली | एमआयडीसी परिसरातील झेनिथ रबर कंपनीला सोमवारी मध्यरात्री आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

 

अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न सुरू आहे. आगीची माहिती मिळताच केडीएमसीच्या महापौर विनिता राणे, नगरसेवक विश्वानाथ राणे आदींनी घटनास्थळी दाखल झाले.

Related posts

विलेपार्ले ते गोरेगावपर्यंत २० टक्के पाणी कपात

swarit

सीएसटी कर्जत लोकलमध्ये गरोदर महिलेला मारहाण

News Desk

मनोज मेहता यांचा मृत्यू, अंधेरी पुल दुर्घटनेत झाले होते जखमी

News Desk