नवी दिल्ली । “भारतीय सुरक्षा दलाने निष्पाप काश्मीरमधील लोकांना मारले असा आरोप करून याचा निषेध नोंदविला प्रकार पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. तसेच इम्रान यांनी काश्मीर प्रश्नी पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला. काश्मीर प्रश्न चर्चेतून सोडविण्यासाठी आता भारताने हात पुढे करण्याची वेळ असल्याचे इम्रान यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट करून निषेध व्यक्त केला आहे.
Strongly condemn the new cycle of killings of innocent Kashmiris in IOK by Indian security forces. It is time India realised it must move to resolve the Kashmir dispute through dialogue in accordance with the UN SC resolutions & the wishes of the Kashmiri people.
— Imran Khan (@ImranKhanPTI) October 22, 2018
काश्मीरमधील कुलग्राम जिल्ह्यातील लर्रू परिसरात काल (२१ ऑक्टोबर)ला दशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. कुलग्राममध्ये भारतीय लष्कराला मिळालेल्या माहितीनुसार एका घरात लपून बसले आहेत. या माहितीच्या आधारे भारतीय लष्करांनी ३ दहशतवाद्यांना मारण्यात यश आले आहे. दहशदवाद्यांना ठार केल्यानंतर जमावाने लष्करावर दगडफेक करून देखील दहशतवाद्यांना घरात घुसून ठार करण्यात जवानांना यश आले. या दरम्यान त्या घरातील विस्फोटक फुटला. त्यामुळे ५ जणांचा जागीच ठार झाले. परंतु जवळपासचे ४३ पेक्षा जास्त नागरीक जखमी झाले आहेत. काल झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांनी आज बंद पुकारला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.