HW News Marathi
देश / विदेश

#NirbhayaCase : जाणून… घ्या ‘निर्भया’च्या केसचा ७ वर्षे ३ महिन्याचा कायदेशीर घटनाक्रम

नवी दिल्ली | तब्बल ७ वर्षे ३ महिन्यानंतर आज निर्भयाला न्याय मिळाला. निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींना आज (२० मार्च) फासावर चढविले आहे. आज सकाळी साडेपाच वाजता तिहार कारागृहात निर्भयाच्या आरोपींना फाशी देण्यात आली. आरोपी मुकेश सिंह, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि विनयकुमार सिंह या निर्भयाच्या चारही आरोपी फाशी देण्यात आली. “उशिरा का होईना पण न्याय मिळाला आहे. आजचा हा दिवस देशातील सर्व मुलींच्या, महिलांच्या नावे“, अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी आशा देवी यांनी माध्यमांनाही बोलताना दिली आहे.

निर्भयाच्या चारही आरोपींनी फाशीपासून वाचण्यासाठी वेळोवेळी कायदेशीर पर्यांयांचा वापर केला. मात्र अखेर न्यायालयाने निर्भयाच्या सर्व आरोपींची याचिका फेटाळून लावल्या. काल (१९ मार्च) रात्री उशीरा निर्भयाच्या आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने चारही आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगित देण्यास नकार दिला. अखेर आज सकाळी निर्भयाच्या चारही आरोपींना पवन जल्लाद यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खटका ओढला आणि विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता या चारही आरोपींना फाशी दिली.

निर्भयाच्या दोषींची तीन वेळा जारी केले डेथ वॉरंट

निर्भया प्रकरणात यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाने २२ जानेवारी रोजी डेथ वॉरंट जारी केले होते. यानंतर पुन्हा एकदा १ फेब्रुवारी फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी केली जाणार होती. परंतु, न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी एका याचिकेवर सुनावणी करताना या शिक्षेची अंमलबजावणी थांबविली होती. न्यायालयाने आतापर्यंत जारी केलेले हे तिसरे डेथ वॉरंट आहे. न्यायालयाने १७ फेब्रुवारी रोजी या प्रकरणातील तिसरे डेथ वॉरंट जारी करीत ३ मार्च रोजी सकाळी ६ वाजता फाशीची तारिख निश्चित केली आहे.

१६ डिसेंबरची ‘ती ‘ काळरात्र

१६ डिसेंबर २०१२च्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. मित्रासोबत खासगी बसमधून मुनिरकाहून द्वारकाला जात होती. बसमध्ये त्या दोघांशिवाय सहा जण होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्राने त्यांना विरोध केला. मात्र, आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. त्यावेळी त्यांनी तिला अत्यंत निर्घृणपणे मारहाणही केली होती. त्यामुळे निर्भया गंभीररित्या जखमी झाली होती. यानंतर आरोपींनी निर्भयाला रस्त्याकडेला फेकून दिले होते. या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. जखमी निर्भयावर आधी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर तिला सिंगापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सिंगापूरमध्ये उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला होता.

असा आहे निर्भयाच्या न्यायाचा घटनाक्रम

  • १६ डिसेंबर २०१२- दिल्ली एका चालत्या बसमध्ये २३ वर्षीय तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार करत तिचा अतिशय अमानवी कृत्य करत लैंगिक छळ करण्यात आला. बलात्कार करणाऱ्यांमध्ये एक अल्पवयीन होता.
  • १८ डिसेंबर २०१२- दिल्ली पोलिसांनी यापैकी चौघांना अटक केली ज्यामध्ये बस चालकाचाही समावेश होता. पुढे उरलेल्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
  • २९ डिसेंबर २०१२- शरीरावर झालेल्या प्रत्येक दुखापतीला आणि असह्य वेदनांना तोंड देणाऱ्या निर्भयाने सिंगापूर येथील माऊंट एलिझाबेथ रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
  • २३ जानेवारी २०१३- अल्पवयीन वगळता पाच बलात्काऱ्यांविरोधात चार्जशीट दाखल करण्यात आली.
  • २८ जानेवारी २०१३- एका नराधमाला जेजेबीकडून अल्पवयीन म्हणून घोषित करण्यात आले.
  • २ फेब्रुवारी २०१३- पाच नराधमांविरोधात १३ गुन्हे नोंदवण्यात आले. ज्यामध्ये त्यांच्यावर हत्येच्या गुन्ह्याचीही नोंद झाली.
  • ११ मार्च २०१३- बस चालक राम सिंह याने तिहार कारागृहात गळफास लावून आत्महत्या केली.
  • ३१ ऑगस्ट २०१३- अल्पवयीन गुन्हेगाराला बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवत ३ वर्षांसाठी त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली.
  • १३ सप्टेंबर २०१३- फास्ट ट्रॅक न्यायालयाकडून चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. ज्यानंतर हा खटला दिल्ली उच्चन्यायालयाकडे फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब होण्यासाठी पोहोचला.
  • १३ मार्च २०१४- दिल्ली उच्च न्यायालयाकडूनही फाशीच्या शिक्षेचे समर्थन करण्यात आले.
  • ३ एप्रिल २०१६ – सर्वोच्च न्यायालयात दोषींच्या याचिकेवर सुनावणीस सुरुवात झाली.
  • ५ मे २०१७- सर्वोच्च न्यायालयानेही अक्षय ठाकुर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश सिंह यांच्या फाशीच्या शिक्षेचे समर्थन केले.
  • ९ जुलै २०१८ – सर्वोच्च न्यायालयाने पवन, मुकेश आणि विनयची पुनर्विचार याचिका फेटाळली.
  • १३ डिसेंबर २०१८ – निर्भयाच्या कुटुंबीयांनी खटला अधिक वेगाने चालवण्यासाठी न्यायालयाचं दार ठोठावलं.
  • ८ नोव्हेंबर २०१९ – आरोपी विनय शर्माने दया याचिका दाखल केली.
  • ६ डिसेंबर २०१९ – एमएचएकडून विनय शर्माची दया याचिका फेटाळण्याचे सांगण्यात आले.
  • १० डिसेंबर २०१९ – आरोपी अक्षय ठाकुरने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली.
  • १८ डिसेंबर २०१९ – सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली.
  • १९ डिसेंबर २०१९ – दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने चारपैकी एका आरोपीचा गुन्ह्याच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला.
  • १७ जानेवारी २०२० – दिल्ली न्यायालयाने चार आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
  • १९ मार्च २०२० – फाशीला स्थगिती देण्याची याचिका दिल्ली हायकोर्टानं फेटाळली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“या चोऱ्यामाऱ्या करणं थांबवलं पाहिजे?”, राऊतांचं पेगॅससवर भाष्य

News Desk

पाकिस्तानमध्ये आजही जीवंत आहे भगतसिंग 

News Desk

मोदींच्या प्रगती पुस्तकामुळे राहुल गांधींवर टिकेची झोड  

swarit