HW News Marathi
Covid-19

देशात एकीकडे रेमडेसिविरचा तुटवडा तर दुसरीकडे भाजप कार्यालयात मिळाले ५००० डोस

गुजरात | देशात एकीकडे कोरोना रुग्ण संख्या वाढत आहेच पण दुसरीकडे देशात लसीकरणालाही जोरदार सुरुवात झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात लसीची कमतरतेमुळे लसीची केंद्र बंद झाली आहेत. इतकंच नाही तर रेमडेसिवीरचाही तुटवडा जाणवू लागला आहे. एकीकडे ही परिस्थतीत असताना दुसरीकडे मात्र गुजरातच्या भाजपच्या एका पक्ष कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

देशभरात रेमडेसिविर इंजेक्शनच्या मागणीत वाढ झाली आहे. सरकारनं केलेल्या दाव्यानुसार हे इंजेक्शन सध्या स्टॉकमध्ये नाही. दरम्यान गुजरातच्या एका पक्ष कार्यालयात लोकांना रेमडेसिविर इंजेक्शन मोफत दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर विरोधी पक्षांनी भाजपच्या या नेत्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

गुजरातचे भाजप अध्यक्ष सीआर पाटील यांनी दावा केला आहे की, भाजप कार्यालयात ५००० रेमडेसिविर इंजेक्शन कोरोना असलेल्या लोकांच्या नातेवाईकांना दिलं जात आहे. यावर आता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रश्नांचा भडीमार सुरु केला आहे. जर रेमडेसिविर स्टॉकमध्येच नाही तर भाजपच्या कार्यालयात एवढ्या मोठ्या प्रमाणात आली कुठून? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

दरम्यान सुरतमध्ये भाजपच्या मुख्य कार्यालयात रेमडेसिविर इंजेक्शन घेण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी लोकांनी सोशल डिंस्टन्सचेही पालन केले नसल्याचे निदर्शनास आले होते. गुजरातचे भाजप अध्यक्ष यांनी लोकांना ५ हजार इंजेक्शन मोफत देण्याची घोषणा केल्यामुळे ही इंजेक्शन्स लोकांना त्यांच्या कार्यालयातून नेण्यास सांगितले होते, अशी चर्चा रंगली आहे.

गुजरातमध्ये या गोष्टी सुरु असताना महाराष्ट्रात रेमडेसिविरचा पुरवठा करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच, ऑक्सिजनचा पुरवठाही रुग्णालयात व्हावा अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात या गोष्टींचा तुटवडा असताना भाजप त्याची मागणी करत असताना दुसरीकडे गुजरातमध्ये भाजपचा कार्यालयात असा त्याचा वापर धक्कादायक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार, विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच केले नाहीत

News Desk

देशातील रुग्ण संख्या ६१ लाखांच्या पुढे !

News Desk

राज्यातील २ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा चांगला परिणाम !

News Desk