HW News Marathi
Covid-19

हाफकिनची लस थेट पुढच्या वर्षी बाजारात येणार, विविध परवानग्यासाठी अद्याप अर्जच केले नाहीत

मुंबई | कोरोना लसीकरण जोरदार करण्यासाठी अनेक कंपन्या पुढे येत काम करत आहेत. पोलिओची लस बनवण्यासाठी नावलौकिक मिळवणार्‍या हापकिन इन्स्टिट्यूटमध्ये, कोरोनावरील लस तयार होण्यासाठी किमान आठ ते नऊ महिने लागतील. सध्या या ठिकाणी लस बनवण्याकरता अत्यावश्यक बांधकाम सुरू असून लागणारी उपकरणे आणि वेगवेगळ्या परवानग्या यासाठी वेळ लागणार आहे. भारत बायोटेक सोबत हापकिन मध्ये कोव्हॅक्सिन लस बनवण्याचे काम सुरू करणार आहे.

सुरुवातीच्या काळात महिन्याला ५ लाखापासून ५० लाखापर्यंत लसीचे डोसे तयार केले जाणार आहेत. हळूहळू उत्पादन एक वर्षात २२ ते २३ कोटी पर्यंत नेले जाईल. मात्र त्यासाठी एवढे उत्पादन होण्यासाठी किमान एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी हाफकिनला केंद्र सरकारकडून ६५ कोटी तर महाराष्ट्र सरकारकडून ९४ कोटी रुपयांचे अनुदान दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

हाफकिन मध्ये तयार होणाऱ्या लसीचा उत्पादन खर्च २० ते ५० रुपयाच्या आत असेल, असा प्राथमिक अंदाज आहे. लसीची नेमकी किंमत किती असावी? अंतिम उत्पादन खर्च किती होईल? यावर सध्या अभ्यास सुरू आहे. पण जी किंमत सध्या सांगितली जात आहे, सध्या उपलब्ध लसींची जी किंमत आहे त्यापेक्षा कितीतरी कमी किंमत हाफकिन मध्ये तयार होणाऱ्या लसीची असू शकेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. तर प्रत्यक्षात उत्पादन सुरू झाल्यानंतर त्यावेळी जे दर असतील त्यानुसार एका लसीचा उत्पादन खर्च किती असेल हे काढता येईल असे डॉ. राठोड म्हणाले.

सुरुवातीला रोज २५ हजार लसी तयार केल्या जातील, असा प्राथमिक अंदाज आहे. यंत्रणेत वाढ करून जास्तीत जास्त उत्पादन कसे वाढवता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत, असे सांगून सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले, किमान सहा ते आठ महिने हाफकिन मधून लसीचे पूर्ण उत्पादन सुरु होण्यासाठी लागतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मिस्टर इंडिया’चा किताब जिंकणाऱ्या मराठमोळ्या बॉडीबिल्डर जगदीश लाडचं कोरोनानं निधन!

News Desk

शाळा नाही तरी जूनमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू झालेच पाहिजे !

News Desk

शेतकरी आत्महत्या लपवण्याची दिक्षा इतर राज्यांनी मोदींकडूनच घेतली !

News Desk