नवी दिल्ली | कोरोनाच्या या संकट काळात अनेक जण विविध राज्यांत, देशात, परदेशात अडकले आहेत. त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी नौदलाने ऑपरेशन समुद्र सेतू लॉंच केले आहे. या ऑपरेशनअंतर्गत परदेशातील भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी नौदलाची आयएनएस जलाश्व ही युद्धनौका मालदीवमध्ये पोहोचली आहे.
या आयएनएस जलाश्व सोबतच आएनएस मगर ही युद्धनौकाही या मिशनचा भाग असणार आहे. या मिशनच्या पहिल्या टप्प्यात १ हजार भारतीयंना परत आणण्यात येणार आहे.मालदिवमधून भारतात येताना सर्व नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. तसेच,या प्रवासादरम्यान, सर्व नागरिकांना कोरोनाशी संबंधित सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार मालदीवहून निघाल्यानंतर या युद्धनौका केरळ कोचीमध्ये येतील. सर्व प्रवाशांना तिथेच उतरवण्यात येईल. त्यानंतर संबंधित राज्यांकडे सुपूर्द करण्यात येतील.
#WATCH INS Jalashwa entering Male port for the first phase under Operation Samudra Setu to repatriate Indians from Maldives: High Commission of India in Maldives. #COVID19 pic.twitter.com/qoNPB9pioZ
— ANI (@ANI) May 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.