HW News Marathi
देश / विदेश

INX Media Case : पी. चिदंबरम यांना आज सीबीआय न्यायालयात करणार हजर

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया घोटाळाप्रकरणी सीबीआयाने हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर ३० तासानंतर सीबीआयने माजी केंद्रीय गृह तथा अर्थमंत्री ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना काल (२१ ऑगस्ट) रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास त्यांच्या जोरबाग येथील निवासस्थानात अटक केली. चिदंबरम यांना आज (२२ ऑगस्ट) दुपारी २ वाजता सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार असून सीबीआयकडून १४ दिवसाच्या कोठडीची मागणी करणार आहे. तर दुसरीकडे काँग्रेसकडून आज पत्रकार परिषद घेतली जाणार आहे. तर चिदंबरम आज पुन्हा जामिनासाठी याचिका दाखल करणार आहेत.

अटक होण्यापूर्वी रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास चिदंबरम नवी दिल्ली येथील काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. अवघ्या सहा मिनिटे चाललेल्या या पत्रकार परिषदेत चिदंबरम यांनी त्यांच्यावर लावल्याले सर्व आरोप फेटाळून लावले. पत्रकार परिषदेदरम्यान अपल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआय अधिकारी पोहोचले होते. परंतु तोपर्यंत परिषद समाप्त करून चिदंबरम जोरबाग येथील निवासस्थानी निघून गेले होते. सीबीआय पथकही मागोमाग जोरबागेत दाखल झाले. चिदंबरम यांच्या निवासस्थानाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. सीबीआय पथक येथे दाखल होताच घराचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेण्यात आले. त्यामुळे सीबीआय अधिकार्‍यांनी संरक्षक भिंतीवरून उड्या मारून घरात प्रवेश केला आणि मुख्य प्रवेशद्वार आतून उघडले. सीबीआयचे वाहनही कंपाऊंडमध्ये आत घेण्यात आले. मोजक्या अधिकार्‍यांनी घरातूनच चिदंबरम यांना ताब्यात घेतले.

दिल्ली उच्च न्यायालयने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडूनही तूर्तास दिलासा मिळू शकला नाही. या प्रकरणावर आज (२१ ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात न्या. रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. हे प्रकरण त्यांनी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याकडे पाठवले होते असून या प्रकरणावर शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सुनावणी होणार आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फेसबुक डेटा लिक प्रकरणी केंब्रिज एनालिटिका कंपनी बंद

swarit

सलमानला तुरुंगावास झाला तर जोधपूर तुरुंगात आसाराम बापू शेजारी

News Desk

बोट उलटल्याने ११ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

News Desk