HW Marathi
देश / विदेश

सीबीआयच्या नव्या संचालकपदी ऋषीकुमार शुक्ला यांची नियुक्ती

नवी दिल्ली | वरिष्ठ आयपीएस अधिकारी ऋषीकुमार शुक्ला यांची सीबीआयच्या नव्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्ला हे १९८३  च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत. माजी सीबीआय संचालक आलोक वर्मा यांना हटविण्यात आल्यानंतर अंतरिम संचालक एम. नागेश्वर राव यांची नियुक्ती करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीच्या बैठकीत शनिवारी (२ फेब्रुवारी) सीबीआयच्या नवीन संचालकांची घोषणा करण्यात आली.

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय निवड समितीने  ५ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे शॉर्टलिस्ट केली होती. या निवड समितीमध्ये पंतप्रधानांसह विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा समावेश आहे. सीबीआयच्या नवीन संचालकांची नियुक्ती आज झालेल्या बैठकीत करण्यात आली. त्यानुसार, सीबीआयचे संचालक म्हणून ऋषीकुमार शुक्ला लवकर सीबीआयचा कार्यभार सांभाळणार आहेत.

Related posts

ईशान्य भारतातील मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड विधानसभा निवडणुकीचे निकाल

स्मृती इराणींने हत्या झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या पार्थिवाला दिला खांदा

News Desk

महाराष्ट्रातील चौघांना ‘जीवन रक्षा पदक पुरस्कार’ जाहीर

News Desk