HW News Marathi
देश / विदेश

इराणमध्ये युक्रेनचे विमान कोसळले, १७० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू

तेहरान | इराणची राजधानी तेहरानमध्ये युक्रेन इंटरनॅशनल एअरलाईन्सच्या विमान कोसळल्याची घटना घडली. या विमानाने तेहरानहून युक्रेनची राजधानी किएफच्या दिशेने उड्डाण भरले होते. विमानातील १७० हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. युक्रेनचे बोईंग ७३७ हे विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. तांत्रिक बिघाडामुळे विमान क्रॅश झाल्याची माहिती इराणच्या वृत्तसंस्थांकडून मिळत आहे. हे विमान ७९०० फुटावरून क्राश झाले आहे. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज (८ जानेवारी) सकाळी ९ वाजता ही दुर्घटना घडली आहे.

या दुर्घटनेदरम्यान इराणने इराकमधील अमेरिकेचे लष्करी तळावर क्षेपणास्त्र हल्ला चढविला. यात इरणाने जवळपासू १० त १२ क्षेपणास्त्र डागण्यात आल्याची माहिती मिळली आहे. अमेरिकेने बगदाद येथील विमानतळाबाहेर शुक्रवारी (३ जानेवारी) केलेल्या हवाई हल्ल्यात इराणच्या कुद्‌स फौजांचे प्रमुख जनरल कासीम सुलेमानी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर इराण विरुद्ध अमेरिका हे दोन्ही देश एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी इराणने इराकमधील अमेरिकी दूतावास तसेच हवाईतळाला लक्ष्य केले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा अमेरिकेच्या मालकीच्या हवाईतळावर मोठा हल्ला इराणने चढवला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा राष्ट्रपती भवनात शिरकाव, १२५ जण सेल्फ आयसोलोशनमध्ये

News Desk

सोहराबुद्दीन बनावट एन्काउंटर प्रकरणी आज होणार अंतिम निर्णय

News Desk

प्रादेशिक भाषेतून न्यायालयाचे निकाल मिळावेत: राष्ट्रपती

News Desk