HW News Marathi
देश / विदेश

भारतीय हॉकी संघाचं दमदार पुनरागमन, स्पेनचा ३-० ने पराभव!

टोक्य। टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत कमालीची कामगिरी बजावत आहे. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या दारुण पराभवानंतर निराश झालेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार पुनरागमन केलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला अ-गटातील दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाकडून १-७ अशा दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. मात्र या पराभवाला मागे टाकत भारतीय हॉकी संघाने विजयाची चव चाखली आहे. भारताने स्पेनचा ३-० ने पराभव करत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. सिमरनजीत सिंह आणि रुपिंदर पाल सिंहने केलेल्या गोल्समुळे भारताने विजय मिळवला आहे.

पहिला गोल करत भारताचं खातं उघडलं

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारत अनेक पदकं जिंकताना दिसत आहे. त्यात आता हॉकी संघाला अव्वल स्थान मिळालं आहे. भारतीय संघाला आठव्या मिनिटाला पहिला गोल करण्याची संधी मिळाली होती. पण सिमरनजीतकडून ती संधी हुकली. यानतंर स्पेनने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली होती, पण भारतीय संघाने त्यांना रोखून धरलं होतं. अखेर १४ व्या मिनिटाला सिमरनजीतने पहिला गोल करत भारताचं खातं उघडलं आहे.

रुपिंदर यावेळी मिळालेल्या संधीचा फायदा घेत दुसरा गोल केला आणि २-० ने आघाडी घेतली. २४ व्या मिनिटाला पीआर श्रीजेशला मैदानात बोलण्यात आलं होतं. हाफ टाइम होईपर्यंत भारत २-० ने आघाडीवर होता. स्पेनेकडून वारंवार आक्रमक खेळी करत सामन्या पुनरागम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण भारतीय खेळाडूंनी संयमी खेळी करत स्पेनला रोखलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

मीराबाई पहिल्या प्रयत्नात यशस्वी

49 किलोग्राम वर्गात महिला वेटलिफ्टिंगची सुरुआत स्नॅच राउंडने झाली. ज्यात मीराबाईने पहिल्या प्रयत्नात 81 किलोग्राम वजन उचललं. ज्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात 87 किलोग्राम वजन उचलंल. तिसऱ्या प्रयत्नात तिने 89 किलोग्राम वजन उचलण्याचा प्रयत्न केला पण ती अयशस्वी ठरली आणि केवळ 87 किलोग्रामच उचलू शकली. त्यामुळे स्नॅच राउंडमध्ये ती दुसरी आली. त्यात चीनच्या जजिहु हिने 94 किलो वजन उचलत पहिला क्रमांक पटकावला आहे.

सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू

बॅडमिंटणपट्टू PV सिंधू ही एक सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे हे आज तिने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवला आहे. रिओ-ब्राझील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी व्ही सिंधूकडून यावेळीही भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. पी व्ही सिंधू ग्रुप जे मधून खेळत असून यावेळी तिच्यासोबत इस्त्रायलची पोलिकार्पोवा आणि हाँगकाँगची चेऊंग यांचा समावेश आहे. ग्रुपमध्ये सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नीरव मोदीला रेड कॉर्नर नोटीस, इंटरपोलने बजावली नोटीस

News Desk

बिकानेर एक्सप्रेसचा भीषण अपघात; अनेक प्रवासी जखमी

News Desk

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळला, महापुरामुळे अनेकजण वाहून गेले, अलर्ट केला जारी

News Desk