नवी दिल्ली | अमृतसरमधील निरंकारी भवनात रविवारी (१८ नोव्हेंबर)मध्ये झालेल्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी एका स्थानिक तरुणाला अटक करण्यात आले आहे. बिक्रमजीत सिंह असे या तरुणाचे हल्लेखोरांचे नाव असून पंजाब पोलिसांनी या तरुणाकडे चौकशी केल्यानंतर हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या मदतीने हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. अटक करण्यात आलेला बिक्रमजीत सिंह हा धालीवाल गावातील रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव अवतार सिंह असून, त्यालाही अटक करण्यात येईल, अशी माहिती पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दिली.
I'm happy to announce that police nabbed one of the two persons involved. 26-year-old Bikramjit Singh has been arrested. The other man will also be arrested soon. His name is Avtar Singh: Punjab CM on #Amritsar blast at Nirankari Mission congregation that claimed 3 lives pic.twitter.com/k0S52mpdKe
— ANI (@ANI) November 21, 2018
पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, या हल्ल्यामागे आयएसआयचा हात असल्याचा माहिती दिली आहे. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू तर २० जण गंभीर जखमी झाले होते. अमृतसरमधील राजासांसी येथील निरंकारी भवनात सत्संग सुरू असताना दोन तरुणांनी ग्रेनेड फेकून हल्ला केला होता. अमृतसरमधील ग्रेनेड हल्ल्यामागे खलिस्तानी दहशतवादी हरमीत सिंह हॅपी उर्फ पीएचडी याचा हात असल्याचे समोर आले आहे. यात पाकिस्तानमध्ये लपलेल्या हॅपी उर्फ पीएचडीने स्थानिक तरुणांच्या मदतीने हा हल्ला घडवून आला होता.
This is the type of grenade which has been taken from other modules. This is the one being used against forces in Kashmir & this is the one that burst. This one is made under license by Pakistan ordinance* factory & is filled with pellets: Punjab CM Captain Amarinder Singh https://t.co/z7QPU1fJ0y
— ANI (@ANI) November 21, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.