बेंगळुरू | भारातासाठी आजचा (६ सप्टेंबर) दिवस हा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. चांद्रयान – २ चंद्रावर सुरक्षितरीत्या उतरण्यासाठी या मोहिमेतील सर्वात अखेरचा टप्पा आहे. इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार चांद्रयान – २ शनिवारी (७ सप्टेंबर) पहाटे पहाटे १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचणार आहे. चांद्रयान -२ हे चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असल्याची माहिती इस्रोकडून मिळाली आहे. हे ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान मोदी ६० विद्यार्थ्यांसोबत बंगळुरुमधील इस्त्रोच्या सेंटरमध्ये उपस्थित राहणार आहेत.
ISRO: The soft landing of #Chandrayaan2 Vikram lander on lunar surface is scheduled between 1:30 am to 2:30 am on Saturday, September 07, 2019. This will be followed by the Rover roll out between 5:30 am to 6:30 am. pic.twitter.com/GCGYrYlohv
— ANI (@ANI) September 6, 2019
चंद्रावर पाणी व खनिजांचा शोध घेण्यासाठी इस्रोने चांद्रायान – २ मोहिमेची आखणी केली. त्यानुसार ऑरबिटर, विक्रम लँडर व प्रज्ञान रोव्हर असलेले चांद्रयान-२ भारतीय बनावटीचे बाहुबली प्रक्षेपास्त्र जीएसलव्ही मार्क ३ ने २२ जुलैला अवकाशात पाठविले. पृथ्वीभोवतीच्या सहा दीर्घवतुर्ळाकार फेऱ्या पूर्ण करून ते १४ ऑगस्टला चंद्राच्या दिशेने गेले. भारताची ही दुसरी चंद्रमोहीम आहे. याआधी भारताने २००८ मध्ये चांद्रयान – १ चे प्रक्षेपण केले होते.
चांद्रायान – २ दुसरा टप्पा २० ऑगस्टला पूर्ण झाला आणि २२ ऑगस्टला एल १४ कॅमेऱ्याने चंद्राची छायाचित्रे पाठवून यान उत्तम काम करीत असल्याचे सिद्ध केले. यानाच्या टेरेन मॅपिंग कॅमेऱ्याने २६ ऑगस्टलागस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील विवरांचे छायाचित्र पाठविले आणि २८ व ३० ऑगस्टला अनुक्रमे तिसरी व चौथी फेरी पूर्ण केली. १ सप्टेंबरला ५ वी फेरी पूर्ण केल्यावर सोमवारी २ तारखेला ऑगस्टला रबिटरपासून विक्रम लँडर यशस्वीरीत्या वेगळे केले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी ही किचकट प्रक्रिया नीट पार पाडली. ३ तारखेला विक्रम लँडर चंद्राच्या अधिक जवळ जात १०४ बाय १२८ किलोमीटर दीर्घ वतुर्ळाकार कक्षेत पोहोचले. बुधवारी विक्रम लँडरची भ्रमण कक्षा कमी करीत ३५ कि.मी.पर्यंत आणली.
चांद्रयान – २ सुमारे ३ लाख ८४ हजार किमीचा प्रवास केल्यानंतर चंद्रावर उतरणार आहे. चंद्रावर उतरण्यासाठी चांद्रयान – २ ला जवळपास ५५ दिवस लागले. चांद्रयान चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर उतरणार आहे. यानंतर वैज्ञानिकांना चंद्राच्या अनेक रहस्यांचा उलगडा होणार आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.