श्रीहरिकोटा | इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून बुधवारी (२२ मे) पहाटे ५.३०च्या सुमारास आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पीएसएलव्ही-सी४६ सह आरआयसॅट-२बी हा उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आला आहे. या उपग्रहाद्वारे आता भारत-पाकिस्तान सीमेवरील सर्व हालचालींवर लक्ष ठेवणे शक्य होणार आहे. आरआयसॅट-२बी या उपग्रहासोबतच सिंथेटिक अपर्चर रडारही अंतराळात लॉन्च करण्यात आले आहे. याचा दूरसंचार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
Indian Space Research Organisation (ISRO) launches PSLVC46 from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. PSLVC46 will launch the RISAT-2B radar earth observation satellite into a 555 km-altitude orbit. pic.twitter.com/iY2paDVjls
— ANI (@ANI) May 22, 2019
🇮🇳 #ISROMissions 🇮🇳
For those who missed watching the launch live, take a look at the majestic lift-off of #PSLVC46!
Mission accomplished successfully! pic.twitter.com/Nec1XkQ7bt
— ISRO (@isro) May 22, 2019
आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे वजन ६१५ किलोग्रॅम आहे. प्रक्षेपणानंतर हा उपग्रह १५ मिनिटाने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत सोडण्यात आला. या उपग्रहांमार्फत भारत-पाक सीमा हालचालींवर लक्ष्य, हवामानाचा अंदाज, नैसर्गिक आपत्तीचा सामना करणे शक्य होणार आहे. हा उपग्रह अंतराळातून जमिनीवरील ३ फूट आकाराच्या वस्तूंचे फोटो घेऊ शकतो. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्यानंतर या मालिकेतील उपग्रह विकसित करण्यात आले होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.