श्रीहरीकोटा | इस्रो (भारतीय अंतराळ संधोधन संस्था) गुरुवारी रात्री ११ वाजून ३७ मिनिटांनी श्रीहरिकोटा अंतराळ केंद्रातून जगातील सर्वात हलक्या असणाऱ्या मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅट या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे. पीएसएलव्ही-सी४४ च्या साहाय्याने दोन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले आहे. यांपैकी मायक्रोसॅट हा उपग्रह लष्करासाठी मोठा फायदेशीर ठरणार आहे. तर कलामसॅट हा उपग्रह विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आला आहे. इस्रोच्या या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान मोदींनी इस्रोचे अभिनंदन केले आहे.
Andhra Pradesh: #ISRO launches #PSLVC44 mission, carrying #Kalamsat and #MicrosatR from Satish Dhawan Space Centre, Sriharikota. pic.twitter.com/yBI7xlKARK
— ANI (@ANI) January 24, 2019
इस्रोचे पीएसएलव्हीच्या साहाय्याने करण्यात आलेले ४६वे प्रक्षेपण असून २०१९ मधली ही इस्रोची पहिली यशस्वी मोहीम ठरली आहे. पंतप्रधान मोदींनी यावेळी कलामसॅट हा उपग्रह तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांचे देखील कौतुक केले आहे. त्याचप्रमाणे इस्रोचे प्रमुख के. सिवन यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले आहे. “देशातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी इस्रो खुले असेल. तुम्ही तयार केलेले उपग्रह आमच्याकडे घेऊन या. आम्ही त्यांचे प्रक्षेपण करू”, असे के. सिवन विद्यार्थ्यांना यावेळी म्हणाले.
Heartiest congratulations to our space scientists for yet another successful launch of PSLV.
This launch has put in orbit Kalamsat, built by India's talented students.
— Narendra Modi (@narendramodi) January 25, 2019
कलामसॅट उपग्रहाचे वैशिष्ट्य
कलामसॅट या उपग्रहाचे वजन केवळ १.२६ किलोग्राम एवढे आहे. चेन्नईतल्या स्पेस किड्स इंडिया या स्टार्टअप कंपनीने फक्त सहा दिवसांमध्ये कलामसॅट या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.