मुंबई। कोरोना रुग्णांची संख्या देशात वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डाने काल (२५ जून) देशभरातील सर्व नियमित मेल, एक्स्प्रेस, पॅसेंजर ट्रेन, मेट्रो, लोकल ट्रेन व उपनगरी रेल्वेगाड्यांची वाहतूक येत्या १२ ऑगस्टपर्यंत बंद राहील, असा महत्त्वपूर्ण निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. मात्र, १२ ऑगस्टपर्यंत रेग्युलर ट्रेनच्या बुकींग केलेल्या प्रवाशांना तिकीटाचा १०० टक्के रिफंड देण्यात येणार आहे, असेही रेल्वे मंडळने स्पष्ट केले आहे. यामुळे आता मुंबईतील लाईफ लाईन ही सर्वसामान्यासाठी १२ ऑगस्टपर्यंत बंद राहणार आहे.
It has also been decided that all the ticket booked for the regular time-tabled trams for the journey date from 01.07.20 to 12.08.20 also stand cancelled: Railway Board https://t.co/t62D3GjOUP
— ANI (@ANI) June 25, 2020
दरम्यान, सध्या मुंबई सुरू असलेल्या लोकल ट्रेनमध्ये फक्त आत्यावश्यक सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी सुरू असणार आहे. तसेच १२ मेपासून सुरू असलेल्या राजधानी विशेष ट्रेन आणि १ जूनपासून सुरू असलेल्या मेल, एक्स्प्रेस या विशेष ट्रेन सुरूच राहतील, असे रेल्वे बोर्डाने स्पष्ट केले आहे. रेल्वेने ३० जूनपर्यंतची रेल्वेने सर्व आरक्षणे रद्द करून पैसे परत देण्याचे याआधी ठरविले होते. आता हा निर्णय ऑगस्ट मध्यापर्यंतच्या आरक्षणास लागू करण्यात आला आहे.
१ जूलै ते १२ ऑगस्ट या काळातील वेळापत्रकाप्रमाणे धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार आहेत. या गाड्यांचे आरक्षण केलेल्या प्रवाशांना तिकिटांचा संपूर्ण परतावा देण्यात येईल. दरम्यान, सध्या सुरु असलेल्या विशेष प्रवासी मेल-एक्सप्रेस यापुढे ही सुरुच राहणार आहे, रेल्वे मंडळाने काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.