मुंबई | भारतीय वायूदलाचे M-17V5 हेलिकॉप्टर तामिळनाडूच्या कुन्नरमध्ये कोसळले आहे. या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत असल्याची माहिती मिळाली आहे. रावत या दुर्घटनेत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती टीव्ही ९ मराठीने दाखवली असून रावत यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत ४ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या दुर्घटनेबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह थोड्याच वेळात संसदेत बोलणार आहे.
या हेलिकॉप्टरमध्ये सीडीएस बिपीन रावत यांची पत्नी मधुलिका रावत या देखील गंभीर जखमी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या दुर्घटनेची माहिती देण्यात आली आहे. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश भारतीय वायुदलाने दिले आहेत. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण १४ जणापैकी ६ जण हे लष्करी अधिकारी होते. घटनास्थळी बचाव कार्य असल्याची माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेचे कारण आद्याप स्पष्ट झाले नाही.
An IAF Mi-17V5 helicopter, with CDS Gen Bipin Rawat on board, met with an accident today near Coonoor, Tamil Nadu. An Inquiry has been ordered to ascertain the cause of the accident: Indian Air Force pic.twitter.com/Ac3f36WlBB
— ANI (@ANI) December 8, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.