HW News Marathi
देश / विदेश

डॉन छोटा राजनला जे. डे. हत्याप्रकरणी जन्मठेप

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह ९ आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुंबईतील विशेष मकोका कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पत्रकार जिग्ना वोरा व पॉल्सन जोसेफची निर्दोष मुक्तता केली आहे.

छोटा राजन हा सध्या दिल्लीच्या तिहाड जेलमध्ये असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात उपस्थित होता. जे. डे. हत्याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. त्यापैकी नऊ जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. छोटा राजन, सतीश काल्या, अभिजीत शिंदे, अरुण डाके, सचिन गायकवाड, अनिल वाघमोडे, निलेश शेंडगे, मंगेश अगरवाल आणि दीपक सिसोडीया यांना जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदी सरकार दलित विरोधी, काँग्रेसचे ट्विटवरुन भाजपवर टीका

News Desk

जपान इंटरनॅशनल को. एजन्सीने राज्यातील विविध मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Aprna

वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

News Desk