जम्मू काश्मीर | जम्मू काश्मीरमधील सोपोरे जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांच्या पथकावर आज (१ जुलै) दहशतवादी हल्ला करण्यात आला. यावेळी १ जवान शहीद झाला असून एका सामान्य नागरिकाचा मृत्यू झाला. यादरम्यान एक फोटो सोशल मीडिया व्हायरल होत आहे. या फोटोत एक जवान लहान मुलाला दहशतवादी हल्ल्यापासून वाचवत सुरक्षित ठिकाणी नेताना दिसत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी हल्ले होत आहेत. यावेळी सर्वसामान्य नागरिकांनाही दहशतवादी लक्ष करत असल्याचे समोर आले आहे. झालेल्या हल्ल्यानंतर हा चिमुरडा हल्ल्यात मारल्या गेलेल्या आपल्या मृत नातेवाईकाच्या शेजारी बसला होता. जवानाने या मुलाची सुटका करत त्याला सुरक्षितस्थळी नेले. फोटोमध्ये जवान मुलाला भीती वाटू नये यासाठी त्याच्याशी गप्पा मारत गुंतवण्याचा प्रयत्न करतानाही दिसत आहे.चिमुरड्याची सुटका केल्यानंतर त्याला त्याच्या आईकडे नेण्यात आले.
#WATCH Jammu & Kashmir Police console a 3-year-old child after they rescued him during a terrorist attack in Sopore, take him to his mother. The child was sitting beside his dead relative during the attack. pic.twitter.com/znuGKizACh
— ANI (@ANI) July 1, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.