HW News Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये २ दहशतवादी ठार

श्रीनगर | जम्मू-काश्मीर येथील सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज (१ फेब्रुवारी) पहाटेपासून चकमक सुरू झाली आहे. यानंतर जवानांनी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील राजपोरा परिसरात झालेल्या चकमकीत दोन दहशहतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आले आहे.

या चकमकी दरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जावनांना यश आले आहे. शाहिद अहमद बाबा आणि अनियत अहमद झिगेर अशी त्या दहशतवाद्यांची नावे आहेत. सुरक्षा जवानांनी केलेल्या कारवाईत मारले गेलेले दोनही दहशवादी हे जैश-ए-मोहम्मद या संघटनेशी संबंधित आहेत. या दहशतवाद्यांकडून एक एसएलआर रायफल आणि एक पिस्तुल जप्त करण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दोनशे रुपयांची नोट उद्यापासून चलनात

News Desk

…असे समजले बेअर ग्रिल्सला मोदींचे हिंदी

News Desk

सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ आहेत !

News Desk