श्रीनगर | . काश्मीरच्या राजौरी आणि पुंछ सेक्टरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाई करण्यात आली आहे. भारतीय सीमारेषेवर पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्याभ्याड दहशतवादी हल्ल्याविरोधात भारतीय लष्कराने मोठी मोहीम हाती घेतली आहे. यासाठी भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई राबवत कधी काळी हिज्बुलचा गड मानल्या जाणाऱ्या काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्याला दहशवादमुक्त केले आहे.
Jammu & Kashmir: Pakistan violates ceasefire at four locations along the Line of Control in Poonch and Rajouri sector pic.twitter.com/y2Jsuh8XmO
— ANI (@ANI) January 24, 2019
काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील बिनेर परिसरात काल (२३ जानेवारी) दुपारी सुरु झालेल्या भारतीय जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय जवानांना यश आले. याआधी शोपियानमधील हेफ श्रीमल भागात मंगळवारी (२२ जानेवारी) सकाळी जवान आणि दहशतवाद्यांकडील तीन एके-47 रायफल जप्त केल्या. या दहशतावाद्यांवर ग्रेनेड हल्ला आणि तीन स्थानिक युवकांच्या हत्येचाही आरोप होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.