HW Marathi
देश / विदेश

पुलवामामध्ये ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ४ दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लासीपोरा परिसरात आज (१ एप्रिल) सकाळी भारतीय लष्कर आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या ४ दहशतवाद्यांच्या कंठस्नान घालण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. यात २ एके रायफल्स, १ एसएलआर आणि १ पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. या ठिकाणी सर्च ऑपरेशन सुरू आहे.

भारतीय लष्कराला लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील लासीपोरा परिसरात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रांनी या संपूर्ण भागामध्ये सर्च ऑपरेशन सुरू केले होते. या दरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय लष्कर गोळीबार सुरू केला. या गोळीबारील लष्कराने चोख प्रत्युत्तर देत ४ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले.

चार ही दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. भारतीय लष्कराची ही मोठी करावाई असल्याचे म्हटले जाते. या ठिकाणी दहशतवाद्यांविरोधात अद्याप सर्च ऑपरेशन सुरू आहे. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असल्याची माहिती आहे.

 

Related posts

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

News Desk

हरसिमरत कौर माझ्याकडे पाहून हसल्या | राहुल गांधी

News Desk

राज्यसभेत सरकारचा पराभव….

News Desk