HW News Marathi
देश / विदेश

आरएसएसचे संजय जोशी आणि प्रविण तोगडिया यांचा गुजरात निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा – हार्दिक पटेल

गुजरातमधील युवाचा आवाज म्हणून हार्दिक पटेलला ओळखले जाते. २०१५मध्ये हार्दिक नावच्या वादळाने गुजरातच्या राजकारणाचे संपूर्ण रुपच बदलून गेले. हार्दिकने पाटीदार समाजच्या आरक्षणासाठी अनेक आंदोलन करुन राण पेटवीले होते॰ यानंतर पटेल यांना चांगली प्रसिद्धी मिळाली.

भाजपने हिंदूच्या मुद्द्यावरुन गुजरात निवडणूक जिंकली असून लोकांमध्ये जातीवादाची दरी निर्माण करण्याची राजकीय खेळी खेळली गेली होती. तर दुसरीकडे सर्व अल्पसंख्याकांना एकत्र घेऊन काँग्रेस भाजपा विरोधात लढताना दिसत होते. पण, ही निवडणूक भाजप विरोधात काँग्रेस नसून भाजप विरोध भाजप असल्याचे स्पष्टपणे दिसून आले होते. गुजरात निवडणुकीत हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकुर यांना काँग्रेस पक्षाने निवडले नसून या तिघांनी काँग्रेसला निवडले आहे.

“ विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया आणि आरएसएसचे संजय जोशी यांनी गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला छुपा पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर भाजपचे नाराज वरिष्ठ नेते मंडळींनी देखील काँग्रेसला समर्थन केले असल्याचे पाटीदार नेता हार्दिक पटेल यांनी HW न्यूजशी बोलताना हा गौप्यस्फोट केला.”

व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक

https://hwnews.in/video/truth-be-told/dr-pravin-togadiya-sanjay-josh/32863

या गुजरात निवडणुकीत राहुल मॉडेल दिसून आले होते. “काँग्रेसने भाजप विरोधात राज्यातील सर्व अल्पसंख्याक नेत्यांना एकत्र करुन ही निवडणूक लढविली होती. येत्या काळात कनार्टकात निवडणुका होणार असून यात देखील गुजरात निवडणुकीची पुनवृत्ती होणार असल्याचे दिसत आहे. याची पाश्वभूमी म्हणून काँग्रेसने कनार्टकातील लिंगायती लोकांना कनार्टकामध्ये एकत्र करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे.”

“भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर देशात मोठ्याप्रमाणात जातीय तेढ निर्माण झालेला दिसून आला. लोकांना आपआपसात लढविणे हे जणू या पक्षाचे ध्येयच आहे. हार्दिकला स्वत:चा राजकीय पक्ष निर्माण करण्याची इच्छा आहे. या पक्षाचे नाव हिंदुस्तान पक्ष असे असेल. भारताला पुन्हा सोन्याचा देश बनवण्याची माझी इच्छा आहे. देशातील आतंकवाद आणि नक्षलवाद याला मुळापासून संपविणे हे माझे स्वप्न असून २०१९मध्ये निवडणूक लढविण्याची वेळ आली तर अशी निवडणूक लढविणार की, भाजपचे डिपॉजितच जप्त करणार असल्याचे देखील हार्दिक यांनी म्हटले”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

PM Care फंडांमध्ये जमा केलेले पैसे NDRF मध्ये हस्तांतरित केले जाऊ शकत नाहीत – सुप्रीम कोर्ट

News Desk

देशातील एकूण कोळसा उत्पादनात ७४.७८ दशलक्ष टनांची वाढ

Aprna

‘शिवसेना सर्टिफाईड गुंडा पार्टी’ राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणतात…

News Desk