श्रीनगर | दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गुल मोहम्मद मीर (६०) यांची दहशतवाद्यांनी घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केली. नौगाम वोरिनाम येथील मीर यांच्या घरात घुसून दहशतवाद्यांनी त्यांच्या छातीत तीन, तर पोटात दोन गोळ्या झाडल्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना काल (४ मे) रोजी रात्री घडली आहे.
Jammu & Kashmir: A BJP worker Gul Mohd Mir has been shot dead by terrorists at Nowgam, Verinag in South Kashmir. Security forces have cordoned off the area. More details awaited. pic.twitter.com/y6RazAOC28
— ANI (@ANI) May 4, 2019
या घटनेने काश्मीरमध्ये एकच खळबळ माचली आहे. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी नाकेबंदी करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले. मीर यांच्या हत्येबद्दल भाजपाकडून दु:ख व्यक्त करण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यातली शांतता भंग करणाऱ्यांविरोधात आणि निष्पापांच्या हत्या करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.
Ghulam Mohd Mir, office bearer of the BJP in South Kashmir has been shot & killed in Nowgam, Verinag. I condemn this dastardly act of violence & pray for the soul of the departed, Allah Jannat naseeb karey.
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 4, 2019
नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष उमर अब्दुल्ला आणि पीडीपीच्या अध्यक्षा महबूबा मुफ्ती यांनी मीर यांच्या हत्येचा निषेध केला आहे. ‘मी या निर्घृण हत्येचा निषेध करतो. गुल मोहम्मद मीर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण परिस्थितीचा सामना करण्याचे धैर्य मिळो,’ असे ट्वीट करत अब्दुल्ला म्हणाले आहे. पीडीपीच्या अध्यक्षा मुफ्ती आणि जम्मू काश्मीर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष जे. ए. मीर यांनीही मीर यांच्या हत्येचा निषेध केला.
I strongly condemn the killing of @BJP4India leader Gul Muhammad Mir
in Verinag, South Kashmir.
My condolences to the bereaved family and prayers for the departed soul.— Mehbooba Mufti (@MehboobaMufti) May 4, 2019
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.