HW Marathi
देश / विदेश

श्नीनगर-जम्मू महामार्गावर बनिहाल येथे कारमध्ये स्फोट

श्रीनगर | श्नीनगर- जम्मू महामार्गावर बनिहाल येथे स्फोट झाला आहे. सॅन्ट्रो कारमधील गॅस सिलेंडरचा स्फोटची झाल्याची माहिती समोर आली आहे. सीआरपीएफच्या ताफा तेथून जात असताना कारमध्ये स्फोट झाला. ताफ्यात सीआरपीएफची आठ ते नऊ वाहने होती. या स्फोटात कोणीही जखमी झाल्याची कोणतीही माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र सीआरपीएफच्या गाडीचे नुकसान झाले आहे. स्फोटानंतर कारचालक बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे.

कारमधून केमिकल, स्फोटके आणि एलपीजी सिलेंडर्स नेले जात असताना हा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची अधिक चौकशी केली जात आहे. या स्फोटानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी ही घटना घडली आहे. त्या भागाची सुरक्षा जवानांनी घेराबंदी केली आहे. याआधी १४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. त्यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर दीड महिन्यांनी अशाच प्रकारचा भ्याड हल्ला घडवून आणण्याचा प्रयत्न झाला आहे.

 

Related posts

गोहत्येच्या संशयावरून उत्तर प्रदेशामध्ये हिंसाचार

News Desk

कुणी मुद्दामहून आमच्या वाटेला आले तर आम्ही त्याला सोडत नाही !

News Desk

काश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या १० दहशतवाद्यांना अटक

News Desk