HW Marathi
देश / विदेश

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच

श्रीनगर | पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे. जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये आज (४ मार्च) पहाटे ३ वाजताच्या सुमारास पाकिस्तानी सैन्यांनी गोळीबारी केली असून या गोळीबारीला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. ही गोळीबारी ६.३० वाजता थांबली.

तसेच जम्मू-काश्मीरच्या हंडवाडा परिसरात झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्‍नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आले आहे. गेल्‍या काही दिवसांपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्‍तानमधील संबंध तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही देशांच्या सीमेवर लष्‍करी हालचालींमध्येही वाढ झाली आहे.

Related posts

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, ३ नागरिकांचा मृत्यू

News Desk

पंतप्रधान मंगळवारी मुंबईत

धनंजय दळवी

धक्कादायक ! राफेल कराराची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती

News Desk