HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेवर दिवसेंदिवस खुसखोरी वाढत आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी (१७ ऑक्टोबर) रोजी सकाळीच्या सुमारास श्रीनगरमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली होती. या चकमकीत तीन दशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश भारतीय लष्कराला यश आले आहे.

श्रीनगरमधील फातेह कादल परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाताच भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी या परिसराला घेराव घातला. या दरम्यान संपुर्ण परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. या चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला आहे. सध्या या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बंगालच्या उपसागरात ‘गाजा’ चक्रीवादळ

News Desk

मराठा आरक्षणावर आता केंद्राने भूमिका मांडावी, मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

News Desk

#CoronaVirus : देशात रुग्णांचा आकडा १९९ वर, तर राज्यात रुग्णांची संख्या स्थिर

swarit
राजकारण

बजरंग दलाचे सर्मथक, कन्हैया कुमारमध्ये हाणामारी

swarit

बेगुसराई । जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार व बजरंग दलाच्या समर्थकांमध्ये भगवानपूरच्या दहिया गावाजवळ दोन गटांमध्ये हाणामारी झाली. यात सहा जण जखमी झाले असून अनेक गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.

भगवानपूरच्या दहिया गावजवळून कन्हैया काही समर्थकांसोबत सभा संपून येत असताना, बजरंग दलाचे कार्यकर्ते त्याला विरोध करत होते. तेव्हा दोघांमध्ये वाद सुरु झाला आणि यावादाचे रुपातंर हाणामारी झाले. कन्हैया यांच्या ताफ्यामधील काही गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. या वादानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

बिहार मधील बेगुसराई मतदारसंघातून कन्हैया कुमार आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याची चर्चा रंगली आहे. कन्हैया महाआघाडीचा उमेदवार असू शकोत अशी शक्यता वर्तविण्यात येते. यासंदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आधीच घोषणा केली आहे. अशी घोषणा भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केली आहे.

Related posts

विधान परिषदेसाठी दराडेंना निवडणूक आयोगाचा हिरवा कंदील

News Desk

जयंत पाटील यांच्या स्वागताला हजारो कार्यकर्ते रस्त्यावर! नियम तोडले म्हणून मंत्र्यांवर गुन्हे दाखल करणार का?

News Desk

मध्य प्रदेशमध्ये भाजप नेत्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या

News Desk