HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-कश्मीर निवडणुकीदरम्यान जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक

श्रीनगर | जम्मू काश्मीरमध्ये पंचायत निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीदरम्यानच पुलवामामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील बबगुंड येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू असून या चकमकीत भारतीय जवानांकडून एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे.

या दहशतवाद्यांनी वारापुर येथील पोलीस कर्मचारी जावीद अहमद यांच्या राहत्या घरी घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे काल (शुक्रवारी) मध्यरात्री दहशतवाद्यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यावर गोळी झाडून त्याची हत्या केली होती. या दहशतवादी हल्ल्यात अहमद यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या परिसरात आणखी दहशतवादी लपून बसल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#RussiaUkraineConflict : रशियाचा युक्रेनवर मिसाईल हल्ला; “मध्ये आलात तर महागात पडेल” – पुतीन यांची धमकी

Aprna

सुप्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचे निधन

Aprna

शशिकलाचीही सुटका होणार

News Desk