HW News Marathi
देश / विदेश

जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

नवी दिल्ली | भारताची सर्वात मोठी खाजगी विमान कंपनी असलेली जेट एअरवेज सध्या मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करत आहे. याच पार्श्वभूमीवर आज (१० मे) जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळाने असे म्हटले आहे कि, आपण कमी पगारात काम करण्यास देखील तयार आहेत.

लोकसभेच्या निकालानंतर सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करेल !

माध्यमांशी बोलताना एका कर्मचाऱ्याने म्हटले कि, आम्ही कमी पगारात काम करण्यास देखील तयार आहोत. मात्र जेट एरवेज पुन्हा सुरु व्हावी अशी आमची इच्छा आहे. सरकार लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर या प्रकरणात हस्तक्षेप करेल असे आश्वासन आम्हाला मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली आहे.

काहीच दिवसांपूर्वी टाटा समूहाच्या ताज हॉटेलने जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांना आपल्याकडे नोकरी देण्याची घोषणा केली होती. दरम्यान, ते किती कर्मचाऱ्यांना नोकरी देतील याबाबत कोणताही खुलासा करण्यात आला नव्हता. मात्र, जेटच्या केबीन क्रूला नोकरी देण्याबाबत बोलणे झाले होते. दरम्यान, मुंबईत वास्तव्यास असणाऱ्यांना ही नोकरी दिली जाईल, अशीही माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०२०च्या वर्षात नोकऱ्यांची संख्येला आर्थिक मंदीचा झटका

swarit

जाणून घ्या…योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट

News Desk

देशातल्या व्यापारी संघटनांनकडून उद्या ‘भारत बंद’ची हाक

News Desk