HW News Marathi
देश / विदेश

‘जेट’चे कर्मचारी आज रस्त्यावर उतरणार, आक्रमक आंदोलन करण्याची शक्यता

नवी दिल्ली | गेल्या अनेक दिवसांपासून मोठया आर्थिक समस्येचा सामना करणाऱ्या ‘जेट एअरवेज’ने बुधवारी (१७ एप्रिल) रात्रीपासून आपली सेवा पूर्णपणे बंद केली. दरम्यान, जेट एरवेजच्या या निर्णयामुळे तब्बल २२ हजार कर्मचारी बेरोजगार झाले. गेले ३ महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन देखील मिळलेले नाही. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांना पुढे काय करायचे याची चिंता भेडसावत आहे. याच पार्श्वभूमीवर ‘जेट’चे कर्मचारी हे आज (२२ एप्रिल) आक्रमक पवित्रा घेत रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती मिळत आहे.

‘जेट’च्या या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (१८ एप्रिल) आक्रमक पवित्रा घेत ‘जेट’च्या कार्यालयाबाहेर ठिय्या धरला होता. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली होती. त्याचप्रमाणे, आज देखील ‘जेट’च्या कर्मचाऱ्यांनी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. जेट एअरवेज गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या आर्थिक समस्येचा सामना करीत आहे. बँकांकडून ४०० कोटींची मदत न मिळाल्याने अखेर ‘जेट’ने सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीला ह्रदयविकाराचा झटका 

News Desk

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटात ३ भारतीयांचा मृत्यू

News Desk

नितीन गडकरींनी ‘या’ कारणांमुळे मनमोहन सिंग यांचे केले कौतुक

Aprna