रांची | चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा भोगत असलेले आरजेडीचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा झारखंड उच्च न्यायालयाने आज (१२ जुलै ) जामीन अर्ज मंजूर केला आहे. न्यायालयाने या प्रकरणात त्यांना ५० हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला. यामुळे लालू प्रसाद यादव बऱ्याच काळापासून कारागृहात असलेल्या त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जामीन मिळाला असून ही लालू यांना अन्य दोन प्रकरणात शिक्षा झालेली असल्याने त्यांनी सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.
Jharkhand High Court grants bail to RJD leader Lalu Prasad Yadav in the fodder scam case relating to Deoghar treasury. (File pic) pic.twitter.com/wWYloD6bew
— ANI (@ANI) July 12, 2019
रांची येथील विशेष न्यायालयाने २९ मे ला चारा घोटाळाप्रकरणी १६ जणांना दोषी ठरवले. त्यांना ३ ते ४ वर्षांची शिक्षा सुनावली होती. एस. एन. मिश्रा यांच्या विशेष सीबीआय न्यायालयाने चाईबासा कोषगार घोटाळा प्रकरणी १६ जणांना दोषी ठरविले होते. यातील ११ जणांना तीन वर्षांची आणि अन्य पाच जणांना चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. लालू यादव यांना देवघरप्रकरणी साडेतीन, दुमकाप्रकरणी ५, तर चाईबासामधील दोन प्रकरणात ७-७ वर्षांची शिक्षा झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.