HW News Marathi
देश / विदेश

जेएनयू हल्ल्यात आइशी घोषसह ९ जण संशयित आरोपी, दिल्ली पोलिसांची माहिती

मुंबई | जवाहर लाल नेहरू विद्यपीठ (जेएनयू) परिसरात रविवारी (५ जानेवारी) रात्री विद्यार्थ्यीं आणि प्राध्याकांवर प्राणघातक हल्ल्या झाला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष गंभीर जखमी झाली होती. या हल्ल्याच्या निषधार्थ देशभरात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि सामन्या नागरिकांनी सहभागींनी आंदोलन केली होती. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने आज (१० जानेवारी) पत्रकार परिषदेत घेतली. यावेळी दिल्ली पोलिसांतील अधिकारी जॉय तिरकींनी हल्ल्यातील ९ संशयित आरोपींची ओळख पटली आहे.

https://twitter.com/ANI/status/1215595985574907904?s=20

दरम्यान, तिरकी म्हणाले की, “सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो, व्हिडीओच्या मदतीने 9 विद्यार्थ्यांची ओळख पटली असून, त्यांना लवकरच नोटीस पाठवण्यात येईल.” यावेळी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयशी घोष, जेएनयू विद्यार्थी संघटनेची सुचेता ताल्लुकदार, चुनचुन कुमार, प्रिया रंजन, डोलन सामंत, योगेंद्र भारद्वाज, विकास पटेल, पंकज मिश्रा आणि वास्कर विजय यांचा समावेश आहे. या पोलिसांनी केलेल्या आरोपानंतर आयशी घोषने माध्यमांना प्रतिक्रिया दिली की, “मी कोणतीही चूक केली नसून माझी खुशाल चौकशी करा, असे आइशी म्हणाली. तसेच माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे माझ्याकडेही पुरावे आहेत.”

जेएनयूमध्ये नेमके काय घडले

दिल्लीतील जेएनयूच्या वसतीगृहात रविवारी (५ जानेवारी) अज्ञात इसमांनी मुलीच्या वसतीगृहात हल्लेखोरांनी लाठ्या-काठ्या घेऊन हल्ला चढविला. या हल्लायत जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष यांच्यावर हल्ला झाला. या हल्लायत त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. जेएनयूच्या विद्यार्थ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अज्ञात हल्लेखोरांनी चेहऱ्यावर मास्क लावले होते. मास्क घालून हातात लोखंडी रॉड, हॉकी स्टीक आणि काठ्या त्यांनी अचानकपणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यास सुरुवात केली. या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह यांनी दखल घेतली असून दिल्ली पोलीस आयुक्तांकडून प्रकरणाची माहिती घेतली. सोबतच या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकारची अग्नपरिक्षा

swarit

तिरंग्यावर पक्षाचा झेंडा ठेवल्याने विरोधी पक्षाकडून संताप व्यक्त!

News Desk

उत्तर प्रदेशात सपा-राष्ट्रवादी एकत्र ,या आघाडीला पाठिंबा का द्यावा?, राऊतांचा सवाल

News Desk