वॉशिंग्टन | कोरोना लसीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेतील जॉन्सन आणि जॉन्सनने अचानक काही काळासाठी कोविड-१९च्या लसीच्या मानवी चाचण्या थांबवली आहे. स्वयंसेवक आजारी पडल्यामुळे चाचण्या थांबवण्यात आल्याचं जॉन्सन आणि जॉन्सनने सांगितले आहे.
जॉन्सन अँड जॉन्सननंही कोरोनावर लस तयार केली आहे. या लसीच्या मानवी चाचण्या सुरु होत्या, पण अचानक एक स्वयंसेवक आजारी पडल्याने कंपनीने कोरोना लसीवरील चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना लसीच्या चाचणीत सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तीची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आहे. त्यामुळे चाचण्या तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत, असं जॉन्सन अॅण्ड जॉन्सनकडून सांगण्यात आले आहे.
जॉन्सन अॅण्ड जॉन्सननं विकसित केलेल्या लशीचे वैशिष्ट म्हणजे कोरोनापासून रक्षण करण्यासाठी या लशीचा एक डोसही पुरेसा आहे. तेच मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचे दोन डोस द्यावे लागणार आहेत. एक डोस पुरेसा ठरला, तर वितरणापासून अनेक गोष्टी आणखी सुलभ होऊ शकतात. कंपनीनं ६० हजार स्वयंसेवकांवर लशीच्या चाचण्या केल्या असून, या लशीचा एक डोस परिणामकारक ठरू शकतो, हे या चाचण्यांमधून दिसून आलं आहे.
Johnson & Johnson is pausing all dosing in its coronavirus vaccine trials due to an unexplained illness in a study participant: Reuters
— ANI (@ANI) October 13, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.