HW News Marathi
Covid-19

जॉन्सन कंपनीच्या ‘सिंगल डोस’ लसवर चर्चा सुरू, हैदराबादमध्ये उत्पादन होणार!

नवी दिल्ली | कोरोना विरुद्धच्या लढ्यात भारताच्या ताफ्यात आता आणखी एक लस उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न नीति आयोगाकडून केला जात आहे. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीनं विकसीत केलेल्या सिंगल डोस लसीबाबत कंपनीसोबत चर्चा सुरू असल्याची माहिती नीति आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी दिली आहे. ते काल (२ जूलै) दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. त्यामुळे कोरोनावर आणखी एक लस उपबद्ध होण्याची चिन्हे दिसत आहेत.

“जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीसोबत चर्चा सुरू असून त्यांनी विकसीत केलेल्या सिंगल डोस लसीची माहिती घेण्याचं काम सुरू आहे. नियोजित योजनेनुसार या लसीची निर्मिती देखील हैदराबादमध्ये ‘बायो ई’कडून केली जाण्याची शक्यता आहे”, असं डॉ. व्ही.के.पॉल म्हणाले. जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीनं कोरोना विरोधी विकसीत केलेल्या लसीचा केवळ एकच डोस घ्यावा लागतो. त्यामुळे या लसीला परवानगी मिळाल्यात देशातील कोरोना लसीकरणाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे. जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीमुळे नागरिकांना लसीचे दोन डोस घेण्याचा त्रास आणि वेळ वाचणार आहे.

दरम्यान, देशातील १२ राज्यांमध्ये डेल्टा प्लसचे एकूण ५६ रुग्ण असल्याची माहिती देखील यावेळी डॉ. पॉल यांनी दिली. असं असलं तरी देशात गेल्या आठवड्यात कोरोना रुग्णांचं प्रमाणात १३ टक्क्यांची घट नोंदविण्यात आली आहे. सध्या देशात दैनंदिन पातळीवर सरासरी ४६ हजार नव्या रुग्णांची भर पडत आहे. पण कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ही अतिशय चांगली गोष्ट असल्याचं आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आता तरी जागे व्हा ! फडणवीसांचा आघाडी सरकारला सल्ला 

News Desk

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब कोरोना पॉझिटीव्ह 

News Desk

“घरात दोन करोना पॉझिटिव्ह, तरी मुख्यमंत्री ‘त्या’ सोहळ्याला उपस्थित कसे ?” भाजपचा सवाल

News Desk