मुंबई | अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या आरोपीला सीबीआयने अटक केले आहे. सीबीआयला जवळपास पाच वर्षानंर दाभोलकर यांच्या हत्येचा उलगडा झाला आहे. औरंगाबादमध्ये सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे. सचिन हा दाभोलकरांवर हल्ला करणाऱ्या दोन आरोपीपैकी एक संशयित आरोपी आहे.
महाराष्ट्र दहशदवादी विरोधी पथकाने (एटीएस)ने सनातन संस्थेचे सदस्य वैभव रऊतसह शरद काळसकर आणि गोंधळेकर या तिघांना अटक केली. यांच्या चौकशी दरम्यान एटीएसला दाभोलकर हत्ये प्रकरणाचा संबंध असल्याचे कळताच एटीएसने अधिक तपास केल्यानंतर मारेकरी सचिन अंदुरे या आरोपीला अटक करून दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे आरोपीला सोपविण्यात आले.
पुरोगामी विचारवंतांच्या सुरक्षेत केली वाढ
गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपी अमोल काळे याच्या डायरीमध्ये डॉ. हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर व मेघा पानसरे यांच्या नावाचा उल्लेख कर्नाटक पोलिसांना आढळला. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी या तिघांनाही “एक्सं’ दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. तसेच या आरोपींच्या रडावर महाराष्ट्रातील इतरही विचारवंत असल्याची सध्या चर्चा आहे. त्यामुळे शनिवार पासून ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत देखील वाढ करण्यात आली आहे.
दाभोलकरांच्या हत्ये प्रकरणी याआधी विरेंद्र तावडे या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यानंतर ही दुसरी अटक आहे. मुंबई उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांवर ताशेरे ओढल्यानंतर दोनच दिवसात ही अटक करण्यात आली आहे. सीबीआयने सचिन अंदुरेची चौकशी केल्यानंतर पुरोगामी विचार सरणीच्या व्यक्ती जेष्ठ पत्रकार कुमार केतरकर, पानसरे कुटुंबामधून मेधा पानसरे, दाभोलकर कुटुंबीय (हामीद आणि मुक्ता) आणि पानसरे कुटुंबीयावर हल्ला केला जाऊ शकतो म्हणून पोलिसांनी काही पुरोगामी व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
कुमार केतकरांच्या सुरक्षेत वाढ कॉंग्रेसकडून वृत्ताला दुजोरा
काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार, लेखक,व्याख्याते आणि ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. तसेच केतकर यांनी अनेक मराठी दैनिकांची संपादकपदे भूषविली आहेत. केतकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या संदर्भात काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत म्हणाले, दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राज्यातील काही विचारवंत तसेच पुरोगामी चळवळीतील महत्वाच्या व्यक्तींची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. केतकर हे संसदेचे सदस्य आणि जेष्ठ पत्रकार असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अरुण सावंत यांनी खासदार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.