HW News Marathi
देश / विदेश

सर न्यायाधीशांविरोद्धात महाभियोगचा प्रस्ताव व्यंकय्या नायडू यांनी फेटाळला

नवी दिल्ली | सुप्रीम कोर्टाचे सर न्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या विरोधात काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी महाभियोग प्रस्ताव उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती एम. व्यंकय्या नायडूनी फेटाळून लावला आहे. या प्रस्तावावर ७१ खासदारपैकी ७ खासदार हे निवृत्त यांच्या स्वाक्षऱ्या केला असून ते कायदेशीररित्या चुकीचे असल्याचे सांगत, हा प्रस्ताव फेटाळला आहे.

न्यायाधीश बी. एच लोया यांच्या मृत्यू प्रकरणात स्वतंत्र चौकशी करण्यांची याचिक सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी महाभियोग प्रस्ताव आणला होता. या प्रस्तावात ७१ राजसभा खासदारांच्या स्वाक्षरी केल्या होता.

  • महाभियोग म्हणजे काय

अकार्यक्षमता किंवा गंभीर आरोपानंतर उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना हटवण्यासाठी जी पद्धती अवलंबली जाते त्याला महाभियोग म्हणतात. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील कोणाही न्यायाधीशाविरुद्ध संसदेची दोन्ही सभागृहे महाभियोग मंजूर करुन, त्यांना पदावरुन हटवू शकतात.

Related posts

आसाराम बापूचा आज निकाल, जोधपूरलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

News Desk

CDS बिपीन रावत यांना वेलिंग्टन सैनिक रुग्णालयाबाहेर लष्करी अधिकाऱ्यांकडून मानवंदना

News Desk

“गडकरींसारखा एखादा नेता शिवसेनेतही हवा होता”, बाळासाहेब ठाकरेंना गडकरींची भूरळ का पडली?

News Desk