HW News Marathi
देश / विदेश

न्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश पदी विराजमान

नवी दिल्ली | देशाचे 50 वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा शपथविधी आज (9 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. मराठमोळे न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत सरन्यायाधीशपदी राहणार आहेत.  न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे पिता न्या. वाय. व्ही. चंद्रचूड सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहलेले होते.

 

दरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश यू. यू. लळित हे मंगळवारी (८ नोव्हेंबर) निवृत्त झाले आहेत. माजी सरन्यायाधीश यू. यू. लळित यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी शिफारस केली होती. गेली अनेक वर्षे रखडलेला अयोध्या जमीन विवाद, शबरीमाला आणि समलैंगिकता यासारख्या मोठ्या खटल्यांमध्ये ते न्यायाधीश राहिले आहेत.

 

डी. वाय. चंद्रचूड यांचा अल्प परिचय
न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर ते वयाच्या ३९ वर्षी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर १९९८ मध्ये ते भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आले. तसेच वकील करत असतात न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवले. २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची तीन वर्षांत सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही चंद्रचूड हे देखील देशाचे सरन्यायाधीश राहिले असून त्यांचे वडील हे सर्वाधिक काळ राहणारे सरन्यायाधीश होते.
संबंधित बातम्या

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केरळच्या गुरुवायूर मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली विशेष पूजा

News Desk

“रिझर्व बँकेच्या नोटांवर गांधींच्या फोटोऐवजी मोदींचा फोटो लावतील…”, तेलंगणाच्या मंत्र्यांचा कॉलेजचे नाव बदलल्यावरुन टोला

Aprna

भारतातील निवडणूक काळात घेणार विषेश काळजी

News Desk