HW Marathi
देश / विदेश राजकारण

दिल्ली हिंसाचारवर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची तडकाफडकी बदली

नवी दिल्ली | दिल्ली हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची रातोरात बदली करण्यात आली आहे. मुरलीधर यांची पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय बदली करण्यात आली आहे.  दिल्ली हिंसाचार प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरून काल (२६ फेब्रुवारी) मुरलीधर यांनी सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. या पार्श्वभूमीवर एस. मुरलीधर यांची बदली झाल्याचा चर्चा रंगल्या आहे.  “भाजपचे नेता कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे दिल्लीत हिंसाचार उसळला, असे याचिकेत म्हटले.

सुनावणीदरम्यान मुरलीधर म्हणाले की, “कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा.”  या प्रकरणी आज (२७ फेब्रुवारी)  होणार सुनावणीमध्ये दिल्ली पोलीस आपली बाजू मांडणार आहेत. मात्र, आजची सुनावणी होण्याआधीच मुरलीधर यांची रातोरात पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नागरिकत्वा सुधारणा कायदा (सीएए)व राष्ट्रीय नागरिकत्वा नोंदणी (एनआरसी) विरोधातील आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या हिंसाचारात आता पर्यंत  ३४ जणांचा मृत्यू झाला असून २५० हून अधिक जण जखमी झाले असून जखमींवर दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात आतापर्यंत १८ एफआयआर दाखल करण्यात आल्या आहेत.

न्यायाधीश मुरलीधर यांची बदली पुर्वनियोजित

दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयात बदली करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलिजीयमने १२ फेब्रुवारीला झाली असून या बैठकीत मुरलीधर यांच्या  बदलीची शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या सल्ल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिल्ली उच्च न्यायालय न्यायाधीश एस. मुरलीधर यांची पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय बदली केली आहे. राष्ट्रपतींनी न्यायाधीश मुरलीधरन यांना पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालय न्यायाधीश म्हणून काम पाहावे असे, आदेश दिल्याचे त्या बाबतच्या अधिसूचनेत म्हटले आहे.

 

Related posts

नववर्षात पेट्रोल-डिझेल स्वस्त

News Desk

गंभीर आजाराच्या रुग्णांना आणि नातेवाईकांना रेल्वे प्रवासाची परवानगी द्यावी, मनसेची मागणी

News Desk

मराठी भाषिकांच्या भावनेला छेद देण्याचे काम देवेंद्र फडणवीसांनी केले – जयंत पाटील

News Desk