HW News Marathi
देश / विदेश

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

नवी दिल्ली | लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभव झाल्यानंत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देशाच्या अनेक राज्यातील काँग्रेसच्या प्रत्येक्षांनी राजीनामा दिला. काँग्रेसमध्ये सध्या राजीनामा सत्र थांबण्याचे नाव घेतना दिसत नाही. आता काँग्रेसचे युवा प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे ज्योतिरादित्य शिंदे पश्चिम उत्तर प्रदेशाच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ‘पराभव माझी जबाबदारी असल्याचे सांगत,’ ज्योतिरादित्या यांना ट्वीट केले आहे. अकाऊंटवर

https://twitter.com/JM_Scindia/status/1147821537128407040

ज्योतिरादित्या यांना ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करत म्हटले की, “लोकसभा निवडणुकीत जनतेने दिलेला कौल मान्य करून, मी पश्चिम उत्तर प्रदेशच्या महासचिव पदाचा राजीनामा देत आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याकडे सोपविला आहे. मला नवी जबाबदारी देऊन पक्षाची सेवा करण्याची संधी देऊन माझ्यावर विश्वास दाखविल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो,” असे ट्वीट ज्योतिरादित्या यांनी केले आहे.

मध्य प्रदेशमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करण्यात ज्योतिरादित्य यांची महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधानसभा निवडणुकीतील कामगिरीनंतर त्यांना मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्री पदासाठी त्यांना प्रबळ दावेदार मानले जात होते. यानंतर पक्षाकडून ज्योतिरादित्य यांना लोकसभा निवडणुकी पश्चिम उत्तर प्रदेशच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. परंतु पक्षश्रेष्ठींनी अद्याप ज्योतिरादित्य यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही.

तसेच मुंबईकाँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा देताना त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत मुंबई शहर युनिटचे निरीक्षण करण्यासाठी तीन वरिष्ठ नेत्यांच्या सामूहिक नेतृत्वाची तात्पुरती स्थापना करण्याची शिफारस केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानव तस्करी प्रकरणी गायक दलेर मेहंदीला २ वर्षाची शिक्षा

News Desk

इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk

पंतप्रधान फिट, देश अनफिट

News Desk