HW News Marathi
देश / विदेश

ज्योतिरादित्य सिंधिया ट्विटरच्या बायोमुळे पुन्हा एकदा चर्चत

नवी दिल्ली | राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडतच असतात. अशातच अनेक वर्ष काँग्रेसमध्ये असणाऱ्या ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्ष सोडत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या गोटात दाखल झाल्यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटच्या बायोमध्ये भाजपचा उल्लेख काढून टाकल्याचे समजत आहे. त्यामुळे मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण येण्याची शक्यता आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आता ट्विटरमधील बायोत स्वत:चा उल्लेख जनतेचा सेवक आणि क्रिकेटप्रेमी असा करायला सुरुवात केली आहे. यानंतर गदारोळ निर्माण झाल्यानंतरही सिंधिया यांनी कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात नवे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.दरम्यान, त्यांच्या ट्विटरच्या प्रोफाइलवरून ‘भाजप’ हटवण्याचा दावा खरा ठरल्यास ज्योतिरादित्य सिंधिया यांचा हा राजकीय दबाव मानला जाऊ शकतो. कारण त्यांनी काँग्रेस सोडण्यापूर्वी पक्षाचे नाव आपल्या ट्विटरच्या प्रोफाइलमधून काढून टाकले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Karnataka Crisis : बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी दिली ६ वाजेपर्यंतची मुदत

News Desk

मुंबई ते अहमदाबाद रेल्वेतील सीट्स रिकाम्याच रिकाम्या 

News Desk

#NirbhayaCase : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

swarit