HW Marathi
कोरोना देश / विदेश मध्यप्रदेश

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ क्वारंटाईनमध्ये,पत्रकार परिषदेत होता कोरोना झालेला पत्रकार

मध्य प्रदेश | मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसला नुकताचं मोठा झटका बसलेला आहे,ॲापरेशन लोटस यशस्वी करून भाजपने सत्ता काबीज केली. आता काॅंग्रेसच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या पत्रकार परिषदेतील सर्व पत्रकारांना क्वारंटाईन करण्यात आले आहे, कारण त्यांच्या पत्रकार परिषदेतील एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

कमलनाथ  यांची 20 मार्च रोजी भोपाळ येथे पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेतील एका पत्रकाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्या पत्रकारालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या पत्रकार परिषदेत किमान 200 पत्रकार उपस्थित होते, अशी माहिती समोर येत आहे.

पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याच्या इतर सहकाऱ्यांनाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यासोबत पत्रकार परिषदेतील उपस्थित नेत्यांनाही क्वारंटाईन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत कमलनाथही उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही क्वारंटाईन केले जाणार आहे.जगभरात सध्या कोरोनाने हाहाःकार माजवला आहे,त्या हाहाःकाराला राजकारणी ही बळी पडताना दिसत आहेत.

Related posts

जनसामान्यांच्या आस्था व भावनांचा सर्वोच्च न्यायलयाने आदर करावा !

News Desk

मोदींच्या कार्यक्रमासाठी आधार सक्ती

News Desk

नवज्योतसिंग सिद्धूंचा मंत्रिपदाचा राजीनामा

News Desk