HW News Marathi
देश / विदेश

शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याने सुनेला मारहाण

नवी दिल्ली | केरळच्या शबरीमला येथील आय्यपा मंदिरात दोन महिलांनी बुधवारी (२ जानेवारी) प्रवेश केला होता. या मंदिरात प्रवेश करून बिंदु आणि कनक दुर्गा हा इतिहास रचणाऱ्या महिलांची नावे आहेत. कनक दुर्गा या ३९ वर्षाच्या आहेत. परंतु कनक दुर्गा यांना त्यांच्या सासूकडून मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे.

या दोन्हीं महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर राज्यभरात त्यांना विरोध झाला होता. मंदिराच्या शुद्धीकरणासाठी मंदिर बंद करण्याचाही निर्णय घेण्यात आला होता. मंदिरात प्रवेश केल्यानंतर कनक दुर्गा तिच्या मैत्रिणीच्या घरी राहिली. मंगळवारी (१५ जानेवारी) तिच्या घरी परतली. समाजाला विरोध करत मंदिरात प्रवेश केल्याने तिच्या सासुने लाकडी फळीने कनक दुर्गाच्या डोक्यावर वार केला. कानकादुर्गाच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने तिला वाचवण्यासाठी पोलिसांनी तातडीने पेरिनथलमन्ना रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने ४-१ असा बहुमताने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय दिला असला तरी अजुनही या मंदिरात महिलांच्या प्रवेशासंदर्भात भाविक आक्रमक आहे. पण हा वाद केवळ मंदिर परिसरापुरता राहिला नसून घराघरात पोहचला आहे. कानक दुर्गा ही नागरी पुरवठा कर्मचारी आहे तर तिची मैत्रिण बिंदू ही कन्नूर विद्यापीठात प्राध्यापक आहे.

सर्वोच्च न्यायालयाची परवानगी आणि तणावाचे वातावरण

भगवान अयप्पांच्या मंदिरात कोणत्याही वयोगटतील महिलांना कोणताही भेदभाव न कराता प्रवेश द्यावा, असा आदेश २८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाच्या परवानगीनंर १७ ऑक्टोबरला मंदिराचे दरवाजे उघडण्याचे आदेश दिले होते. या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयामुळे येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. केरळमध्ये धार्मिक संघटनांनी आंदोलन करून नाराजी व्यक्त करत असून मंदिराबाहेर निदर्शने, मोर्चे काढल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यानंतर केरळमधील निल्लकल, पंपा, एल्वाकुलम, सन्निधनम या भागात कलम १४४ नुसार जमावबंदी लागू करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची गोळ्या झाडून हत्या

News Desk

‘सीएए’चा देशातील मुस्लीम नागरिकाला धोका नाही, सरसंघचालकांचं वक्तव्य

News Desk

भंडारा दुर्घटनाप्रकरणी पीडित कुटुंबांना मोदींकडून प्रत्येकी २ लाख रुपये 

News Desk