मुंबई | सीएए आणि एनआरसी आणि एनपीआर विरोधात बंगळुरूमध्ये २० फेब्रुवारी रोजी संविधान बचवा रॅली आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अमूल्या लिओना या नावाच्या तरुणीने ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या होत्या. यानंतर अमूल्या लिओनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. अमूल्या हिला काल (११ जून) सकाळी सत्र न्यायालयाने तिला जामीन नाकारला होता. मात्र, त्यानंतर बंगळुरू न्यायालयाने काल रात्री उशीरा तिला जामीन मंजूर केला. अमूल्याला तब्बल चार महिन्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Karnataka: A Bengaluru court granted bail to Amulya Leona who raised the slogan of 'Pakistan zindabad' at an anti-CAA-NRC rally on February 20, last night. (File pic) pic.twitter.com/WgoBQGO5Wk
— ANI (@ANI) June 12, 2020
या संविधान बचाव रॅलीला एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी संबोधन केले. यानंतर व्यासपीठावर अमूल्या लिओना हिने पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. त्यावेळी ओवेसी यांनी धाव घेत अमुल्याकडून माईक खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. सभेच्या आयोजकांनीही तिला अडवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बंगळुरू पोलिसांनी अमूल्या हिला ताब्यात घेतले.
या प्रकरणाचा खासदार ओवेसी यांनी या घटनेचा निषेध केला. या प्रकरणानंतर ओवेसी म्हणाले, “आयोजकांनी या तरुणीला आंमत्रण द्यायला नको होते. मला हे आधीच माहित असते तर मी या रॅलीला आलोच नसतो. आम्ही भारतीय आहोत असून आमच्या शत्रू राष्ट्राला कधीच पाठिंबा नव्हता.”
संबंधित बातम्या
ओवेसींसमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा देणाऱ्या तरुणीला न्यायालयीन कोठडी
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.