HW News Marathi
देश / विदेश

अखेर बीएस येडियुरप्पा यांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

बंगळुरू । भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी (२६ जुलै) कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल वजुभाई वाला यांनी राजभवनात त्यांना मुख्यमंत्री पदाची आणि गोपनियतेची शपथ दिली. राजभवनावर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात येडियुरप्पा यांचा शपथविधी सोहळा पार पडला. येडियुरप्पा यांना २९ जुलैला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. येडियुरप्पा यांचाच शपथविधी झाला आहे.

विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतरच अन्य मंत्र्यांना शपथ देण्यात येईल, अशी माहिती मिळाली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करून मगच मंत्रिमंडळ ठरवू, असे येडियुरप्पा यांनी स्पष्ट केले. राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला होता. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी त्यांनी तेथील भाजप कार्यालयात जाऊन अन्य नेत्यांची भेट घेतली. कर्नाटकातील १७ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर कर्नाटक सरकार अल्पमतात आले होते.

कर्नाटकातील बहुमताचा आकडा

कर्नाटक विधानसभेचे संख्याबळ २२५ आहे. एक अपक्ष आणि दोन काँग्रेसच्या आमदारांना सभापती रमेश कुमार यांनी अपात्र ठरविले आहे. मात्र, आणखी १४ बंडखोर आमदारांवर निर्णय झालेले नाही. येडियुरप्पा बहुमत सिद्ध करतील तेव्हा हे १४ बंडखोर विधानसभेत उपस्थितीत राहण्याची शक्यता कमी आहे. त्यावेळी सभागृहात उपस्थितीत सदस्यांची संख्या २०८ असेल. बहुमताचा आकडे १०५ वर येईल. भाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यामुळे येडियुरप्पा विश्वासदर्शक ठराव जिंकतील हे निश्चित मानले जाते.

असा आहे येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री पदाचा प्रवास

  • ७६ वर्षांचे येडियुरप्पा हे कर्नाटकाचे २५ वे मुख्यमंत्री आहेत. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.
  • तिसर्‍यांदा १७ ते १९ मे २०१८ असे अवघे तीन दिवस ते मुख्यमंत्रीपदावर होते.
  • १७ मे २००८ ला ते दुसर्‍यांदा मुख्यमंत्री बनले. ३१ जुलै २०११ पर्यंत ते पदावर होते.
  • पहिल्यांदा १२ नोव्हेंबर २००७ ते १९ नोव्हेंबर २००७ असे केवळ आठ दिवस ते मुख्यमंत्री होते.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे अलाहाबाद मध्ये दंगल

News Desk

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध करताना शशी थरुर म्हणाले…

Darrell Miranda

…तर पाकिस्तानला ओसाड बनवू, नितीन गडकरींचा इशारा

News Desk