HW News Marathi
देश / विदेश

गिरीश कर्नाड यांच्या निधनानिमित्ताने कर्नाटक सरकारकडून ३ दिवसांचा दुखवटा जाहीर

नवी दिल्ली | कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि अभिनेता गिरीश कर्नाड यांचे सोमवारी (१० जून) प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बेंगळुरूत त्यांच्या घरातच उपचार सुरु होते. कर्नाड यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांच्या बंगळूर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला आहे. दरम्यान, गिरीश कर्नाड यांच्या निधनानिमित्ताने कर्नाटक सरकारकडून ३ दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, एक दिवस सार्वजनिक सुट्टीही घोषित करण्यात आली आहे.

गिरीश कर्नाड यांनी चित्रपटसृष्टीत वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. गिरीश कर्नाड यांचा हा चित्रपट एस. एल. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते. नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले.

मराठी चित्रपट ‘उंबरठा’मध्येही त्यांनी भूमिका साकारली होती. पद्मश्री, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तुघलक, नागमंडल, हयवदन या मराठी नाटकांचे त्यांनी दिग्दर्शन केले. गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राधे माँ यांचे जुन्या आखाड्यात पुनरागमन !

News Desk

भारत, अमेरिका आणि जपान या तीन देशांचा “मलबार 2017′ नौदल सराव सुरू

News Desk

भारत-इस्राइल लढणार दहशतवाद्यांविरोधात

News Desk